आरक्षण मर्यादा उठवा मागणी मान्य होईल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट(reservation) करून महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले आहे. सरकार जो सर्वमान्य तोडगा काढेल त्यास आमचे समर्थन असेल अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात कोणताच पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत नाही. मात्र त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून मराठा आरक्षणास विरोध केला आहे. छगन भुजबळ यांनी तर मराठ्यांना कोणतेच आरक्षण मिळणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर आरक्षणावरील मर्यादा उठवण्याची मागणी काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केली आहे. या एकूण पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 13 ऑगस्ट पर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी दिनांक 26 जुलै 1902 रोजी करवीर संस्थानात मागासवर्गीयांना आरक्षण(reservation) दिले. या क्रांतीकारक निर्णयाचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवही 2027 मध्ये होईल. शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी राहुल गांधी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या आरक्षण निर्णयाचा उल्लेख करून आरक्षणावरील मर्यादा उठवण्याची मागणी केली आहे. आपण. ही मागणी राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयास मागासवर्गीय संघटनांच्या कडून समर्थन मिळण्याची शक्यता फारच धुसरं आहे.

राहुल गांधी यांची मागणी मान्य करावयाची ठरवल्यास भारतीय घटनेत दुरुस्ती करावी लागेल. अशी घटना दुरुस्ती होऊन आरक्षणावरील मर्यादा काढून टाकल्या तर आरक्षणाचे लढेच थांबतील. पण मर्यादा उठवण्याची मागणी मंजूर होण्याची शक्यता कमीच दिसते.

मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 13 जुलै चा अल्टीमेटम देऊन अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषण सुरू केले होते मात्र पाचव्या दिवशी त्यांनी एकतर्फीच उपोषण मागे घेऊन दिनांक 13 ऑगस्ट ची डेडलाईन सरकारला दिली आहे. जरांगे पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट केले आहे. त्यामुळे भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना त्यांनी अंगावर घेतले आहे. भाजपने जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार हेच असल्याचा आरोप केला आहे, आणि शरद पवार यांनी त्याचा इन्कार केलेला नाही. पण भुजबळ यांच्या मागे भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप होतो आहे, त्याचे भाजपकडून जोरदारपणे खंडन केले जात नाही. हे सुद्धा इथे लक्षात घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, आम्ही ते मिळवून देणार आहोत असे ते उपमुख्यमंत्री म्हणून सांगतात.

जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे. आता मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या तिघांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट शब्दात व्यक्त करावी असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. पण या तिघांच्या ही भूमिका सावधपणाच्या आहेत. सर्वमान्य तोडगा निघत असेल तर तो आम्हास मान्य आहे किंवा असेल असे हे तिघेही नेते सांगतात.

सरकारकडून, अर्थात देवेंद्र फडणवीस(reservation) यांच्याकडून मला तुरुंगात टाकून मारण्याचा बेत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका आपण लढवणार आहोत पण कोणाला सोबत घेऊन या निवडणुका लढवायच्या हे आपण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर करू असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. प्रस्थापित आमदारांना पाडण्यासाठी आम्ही 288 जागा लढवू असा इशारा ते देत असले तरी, सकल मराठा समाजाचे उपद्रव मूल्य काय आहे हे ते या निवडणुकीत दाखवून देतील असे वाटते.

मनोज जरांगे पाटील यांनी हा मरण उपोषणाच्या माध्यमातून महायुती सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न यापूर्वी केले आहेत. आताही त्यांनी दिनांक 13 ऑगस्ट ची डेडलाईन देऊन सरकारला खिंडीत पकडण्याचे ठरवलेले दिसते. मराठा आरक्षण प्रश्नावर कोणताही राजकीय पक्ष स्पष्टपणे बोलावयास तयार नाही असे सांगणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव ची भूमिका घेऊन मराठा आरक्षणाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. हेच प्रकाश आंबेडकर सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी उभे राहिले होते. आता मात्र त्यांनी विरोधी भूमिका घेऊन ओबीसी संघटनांना आपले समर्थन दिले आहे.

इंडिया आघाडीचे प्रमुख राहुल गांधी यांनी आरक्षणावरील मर्यादा उठवण्याची केलेली मागणी ही धाडसी आहे. मागासवर्गीय संघटना तसेच राजकीय पक्ष हे राहुल गांधी यांच्या मागणीला समर्थन देतील असे वाटत नाही. केंद्र शासनही या मागणीवर विचार करण्याची शक्यता नाही.

हेही वाचा :

तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनी आमने-सामने; ‘या’ राशी कमावतील चिक्कार पैसा

ब्रेकअपनंतरही अर्जुनला मलायकाची काळजी; इव्हेंटमधील कृतीने वेधलं लक्ष

हार्दिक-नताशाच्या नात्यात नवा ट्विस्ट! घटस्फोटानंतर ‘या’ गोष्टीमुळे सुरु झाला वाद?