प्ले ऑफचे तिकीट मिळणार की पत्ता कट, आज दिल्ली-लखनऊ यांच्यात संघर्ष

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाचा सुरू असलेला संघर्ष आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय. तरीसुद्धा प्ले ऑफचे संघ अद्याप अनिश्चित असून त्यासाठी दिल्ली (delhi)आणि लखनऊ यांच्यात धडपड पाहायला मिळणार आहे.

दिल्लीचे (delhi)प्ले ऑफमध्ये पोहोचणे आणखी अवघड झाल्यामुळे लखनऊविरुद्ध ते किती मोठा विजय मिळवतात यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उद्या ते आपला अखेरचा म्हणजेच 14 वा सामना खेळणार असून ते आपला आयपीएलचा शेवट गोड करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचा नेट रनरेट फारच मागे असल्यामुळे त्यांचे आव्हान संपल्यातच जमा आहे; मात्र त्यांचा विजय लखनऊच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आणू शकतो.

सध्या आयपीएल रोमांचक वळणावर येऊन ठेपले आहे. प्रत्येक संघाचे अवघे एक-दोन सामने शिल्लक राहिलेले असताना अद्याप प्ले ऑफचे चित्र अस्पष्ट आहे. सध्या कोलकाताच प्ले ऑफचे तिकीट पक्के करू शकला आहे. मात्र, अद्याप दोन, तीन किंवा चौथ्या क्रमांकाचा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. पाच संघ सध्याच्या घडीला प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. यामध्ये राजस्थान, चेन्नई, हैदराबाद, आरसीबी, लखनऊ यांचा समावेश आहे. काल झालेल्या दोन सामन्यांमध्ये चेन्नई आणि आरसीबीने विजय मिळवल्यामुळे पुन्हा एकदा गुणतालिकेचे समीकरण बदलले आहे. चेन्नईकडून पराभूत होऊनही राजस्थान 16 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. अद्याप त्यांचे 2 सामने बाकी आहेत. यापैकी एकही जिंकल्यास ते 18 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील.

तर, प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी चेन्नईला शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे. चेन्नईचा पराभव झाल्यास बंगळुरूचेदेखील 14 गुण होतील. तसेच लखनऊदेखील 14 गुण मिळवू शकते. त्यामुळे 14 गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर नेट रनरेट हा महत्त्वाचा ठरणार आहे.
उद्याचा सामना हा लखनऊसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे उद्या दिल्लीला पराभूत करण्याच्या इराद्याने लखनौ मैदानात उतरणार आहे. उद्याच्या सामन्यात लखनऊने विजय मिळवल्यास ते थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानी झेप घेऊ शकतात. त्यामुळे उद्याच्या सामन्यात विजय मिळवणे लखनऊसाठी अनिवार्य असणार आहे. मात्र, दिल्लीचे आव्हान संपले असून उद्या त्यांचा शेवटचा सामना असल्याने ते शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरतील.

हेही वाचा :

कुरुंदवाड येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

कोल्हापूरात रेशन दुकानदारांना मिळणार 5G पॉस मशीन; धान्य वितरणाला येणार गती

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात