पावसाने घेतली गुजरातची विकेट

अवकाळी पावसाने गुजरातची(gujarat) विकेट घेतली. मुसळधार पावसामुळे गुजरातसाठी करो आणि मरोची कोलकाताविरुद्धची लढत एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण विभागून देण्यात आल्यामुळे कोलकाता आता पहिल्या दोन स्थानावर कायम राहणार हे निश्चित राहणार, मात्र आता प्ले ऑफच्या उर्वरित तीन स्थानांसाठी राजस्थान, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ आणि बंगळुरू या पाच संघांमध्ये चुरस रंगेल.

गेल्या दोन्ही आयपीएलची अंतिम फेरी खेळलेला गुजरात(gujarat) यंदा साखळीतच बाद झाला. आज त्याला विजय अनिवार्य होता, मात्र पावसाने त्यांचा घात केला. पंचांनी आजचा सामना किमान पाच षटकांचा तरी व्हावा म्हणून प्रयत्न केले, पण पावसाच्या अवकृपेमुळे आयपीएलचा पहिला सामना पूर्णपणे वाया गेला. सामना रद्द झाल्यामुळे गुजरातला केवळ एकच गुण मिळाला आणि त्यांचे आयपीएलमधील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. आता प्ले ऑफच्या तीन स्थानांसाठी पाच संघांना विजयासह नेट रनरेटची लढाई जिंकावी लागणार आहे. आतापर्यंत मुंबई, पंजाब, गुजरातसह दिल्ली या चार संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

राजस्थान, हैदराबाद, चेन्नईला अधिक संधी
कोलकात्याने आधीच प्ले ऑफ गाठले आहे. तसेच उर्वरित 3 स्थानांसाठी राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नईला अधिक संधी आहे. राजस्थानच्या दोन लढती शिल्लक असून त्यांना प्ले ऑफसाठी एक विजय पुरेसा आहे. मात्र ते दोन्ही सामने हरले तर त्यांचा फैसला नेट रनरेटवर होईल.

हैदराबादलाही प्ले ऑफसाठी एक विजय पुरेसा ठरू शकतो. ते आयपीएलमधून बाद झालेल्या पंजाब आणि गुजरातशी भिडणार आहेत. चेन्नईचे भवितव्य बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात ठरणार असले तरी नेट रनरेटच्या लढाईत पराभवानंतरही चेन्नईच पुढे राहण्याची शक्यता आहे. मात्र लखनऊने पुढील दोन्ही सामने जिंकले तर प्ले ऑफची चुरस शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहील.

हेही वाचा :

इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….

हातकणंगलेत डंपर दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

 ‘…अन्यथा शिक्षा व्हायला हवी’; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला