‘…अन्यथा शिक्षा व्हायला हवी’; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला

देशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदानाला(define otherwise) सुरुवात झाली असून अनेक नागरिक सध्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. नागरिकांसोबतच अनेक मराठी सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. आज सकाळी पुण्यात अभिनेते अमोल कोल्हे, सुबोध भावे, राहुल देशपांडे, मोहन आगाशे, बेला शेंडे, श्रृती मराठे आणि सोनाली कुलकर्णी यांनी आज पुण्यात मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यात आज ११ मतदारसंघात मतदान(define otherwise) होणार आहे. त्यात शिरुर, छत्रपती संभाजी नगर, पुणे अशा अनेक ठिकाणी मतदान होणार आहे. यावेळी पुण्यामध्ये, अभिनेता सुबोध भावेने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमासोबत संवाद साधला होता.

अभिनेता सुबोध भावे म्हणतो, “जर तुम्ही सुट्टी देऊनही मतदान केलं नाही तर, तो राष्ट्रीय गुन्हा म्हणून जाहीर करावा. यासाठी शिक्षा व्हायला हवी. जोपर्यंत शिक्षा होत नाहीना तोपर्यंत मतदानाची भावना आपल्या मनात तयार होत नाही. आपल्याकडे शिक्षा झाल्यानंतरच नियमांचं महत्व कळतं. तर तसं जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्याचं महत्व आपल्या मतदारांना कळणार नाही.”

तर श्रुती मराठेनेही प्रतिक्रिया दिलेली आहे. ती म्हणते, “मतदानाचा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच आहे. नंतर आपण ५ वर्षे रडून कुठलं सरकार आलं हे करण्यापेक्षा हक्क बजावलेला बरा.” मतदान करत नाही, त्या लोकांवरही तिने टीका केली आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, “जर जाणीव असती तर सुट्टी घेतली नसती. ही सुट्टी जाऊन मज्जा मस्ती करण्याची नाही. तुम्हाला मिळालेला जो हक्क आहे, तो वापरण्याची आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कृपया वेळेतच जाऊन तुम्हीही मतदानाचा हक्क बजवावा.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….

हातकणंगलेत डंपर दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली, मतदारानेही थप्पड मारली Video