धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता(actor) चेतन चंद्रा याच्यावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चेतन चंद्रा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत चेतन चंद्रा रक्तबंबाळ झाला आहे. ही घटना 12 मे रोजी बेंगळुरूमध्ये घडलीय. या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या चेतन चंद्राने व्हिडीओ शेअर केला. चेतन चंद्रा हा कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.

रविवारी चेतन चंद्रा(actor) मदर्स डे निमित्ताने आईसोबत मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. मंदिरातून परतत असताना जमावाने मारहाण केली. यामध्ये अभिनेत्याचे नाक तुटले आहे. इंस्टाग्रामवर अभिनेता चेतन चंद्रा याने रक्तबंबाळ अवस्थेत एका व्हिडीओ शेअर केला आहे. मला न्याय हवा, अशी कॅप्शन देत आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे.

व्हिडिओमध्ये चेतन चंद्राने सांगितले की एका मद्यधुंद व्यक्तीने त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या कारचे नुकसान केले. चेतनने सांगितले की, तो माणूस मला लुटण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून, मी त्याच्याकडे गेलो आणि कारच्या नुकसानीबद्दल विचारले. काही मिनिटांतच एक महिला आणि सुमारे 20 लोक तेथे जमले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.

चेतनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ लाईव्ह सेशनवर रेकॉर्ड केला. माझ्यासोबत आज काय झाले, त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझे नाक तोडले असे त्याने सांगितले. पोलिसांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, हल्ला करणारी टोळी पुन्हा आली आणि त्यांनी माझ्या कारचे नुकसान केले. हा धक्कादायक अनुभव असल्याचे चेतनने सांगितले.

चेतन चंद्राने सांगितले की, या घटनेनंतर ताबडतोब पोलिसांची मदत घेतली आणि तक्रार नोंदवली. कागलीपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. ल्लेखोर दारूच्या नशेत होता आणि अभिनेत्याच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

चेतन चंद्रा हा कन्नड चित्रपट आणि टीव्हीतील प्रसिद्ध नाव आहे. टीव्ही मालिका ‘सत्यम शिवम सुंदरम’मुळे लोकप्रिय झाला. त्याशिवाय काही कन्नड चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या.

हेही वाचा :

इचलकरंजीत तरुणाचा पाठलाग करून खून….

हातकणंगलेत डंपर दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

 ‘…अन्यथा शिक्षा व्हायला हवी’; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला