राज्यात महायुतीची(political issues) सत्ता आल्यानंतर आजपासून नागपुर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विधानसभेत हिवाळी अधिवेशन हे 16 डिसेंबरपासून ते 21 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. अशातच आज सभागृहात मोठ्या संख्याबळासह देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या बाकावर बसणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ताधाऱ्यांच्या बाकावर पाहायला मिळणार आहे. अशातच आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
नागपुर येथे आज हिवाळी अधिवेशनाला(political issues) सुरुवात होणार आहे. अशातच आज सभागृहात नवनिर्वाचित मंत्री आणि सदस्यांचा परिचय देखील करुन दिला जाणार आहे. यासोबतच आज अधिवेशनात काही नवीन विधेयक देखील मांडली जाणार आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन हे अनेक मोठमोठ्या मुद्द्यांनी गाजणार आहे.
याशिवाय या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयक मांडण्यात येणार आहेत. यामध्ये कापूस, सोयाबीनचे पडलेले दर, ईव्हीएम या मुद्द्यावर हे हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. तसेच आजपासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन हे महायुती सरकारचे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
या अधिवेशनात सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर देखील मोठ्याप्रमाणात चर्चा होणार आहे. तसेच या अधिवेशनात विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देखील दिलं जाणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
तसेच महायुती सरकारच्या स्थापनेनंतर 15 व्या विधानसभेचे नियमित होणारे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. मात्र या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, कृषी उत्पादनांसाठी हमीभाव, रोजगार आणि इतर अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होण्याची अपेक्षा असणार आहे.
हेही वाचा :
राज्यात थंडीची लाट; पारा दहा अंशांखाली…
“…तर फडणवीसांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल”; राऊतांचं वक्तव्य
सैफ अली खान आणि रणबीर कपूरमध्ये वाद? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल