मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने(yojana) अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी मोठी बातमी आहे. काही महिलांच्या बँक खात्यावर लवकरच थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांना मागील हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांना आता एकत्रित रक्कम मिळण्याची आशा आहे.

या योजनेत(yojana) पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करून दिले जातात. ही योजना महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून गरजू, गरीब, घटस्फोटित आणि विधवा महिलांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आहे.
हप्ता वेळेवर न मिळाल्याने संभ्रम :
गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत नियमित हप्त्यांच्या वितरणात अडचणी आल्या आहेत. तसेच मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये मिळाला. दरम्यान, जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला.
मात्र अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक महिलांना वाटत आहे की, त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे का?
सरकारचा स्पष्ट संकेत – काळजी करू नका :
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे की, काही महिलांना तांत्रिक कारणामुळे हप्ता वेळेवर मिळू शकलेला नाही. त्यामुळे ज्या लाभार्थींना जूनचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना जून व जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळून 3000 रुपये जमा होऊ शकतात.
अधिकाऱ्यांनी सूचित केलं आहे की, लाभार्थी महिलांनी काळजी न करता आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावं आणि काही दिवसांत रक्कम जमा झाली नसल्यास स्थानिक महिला बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

13वा हप्ता लवकरच जमा होणार :
या योजनेचा आतापर्यंत 12 हप्त्यांचा लाभ दिला गेलेला आहे. आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, त्यावर काम सुरू असून तो जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
कोण लाभ घेऊ शकतात? :
– 21 ते 60 वयोगटातील महिला
– कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत असणाऱ्या महिला
– घटस्फोटित, विधवा किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना प्राधान्य
– आवश्यक कागदपत्रांसह महात्मा गांधी रोजगार हमी योजना यादीत नाव असणे आवश्यक
हेही वाचा :
महापराक्रमाचा इतिहास आता जागतिक पटलावर
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान