कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

करदात्यांनी आयटीआर भरण्यास सुरुवात केली आहे.(money)आयटीआर भरताना विशेष काळजी घ्यायची असते. तुम्ही तुमच्या उत्पन्नाची खरी माहिती द्यायची असते. अनेकदा करदाते टॅक्स वाचवण्यासाठी खोटी माहिती देतात किंवा अनेकदा उत्पन्नाची माहिती देतच नाही. यामुळे खूप अडचणी येऊ शकतात. परंतु तुमच्या काही उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही.काही उत्पन्न असे आहेत की जे टॅक्स फ्री असणार आहेत. त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. जाणून घ्या कोणत्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही.

शेतीतून येणारे उत्पन्नआयकर कायदा कलम १०अंतर्गत शेतीवर सर्व उत्पन्नावर टॅक्स लागत नाही.इन्श्युरन्स पॉलिसीमधील पैसेजीवन विमा पॉलिसीवरील बोनस अकाउंट आणि गोष्टींवर टॅक्स लागत नाही. यासाठी काही अटी आहेत.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पब्लिक प्रोव्हिडंट फंडवरील व्याजदर आणि मॅच्युरिटीवर(money) मिळणाऱ्या सर्व अमाउंटवर टॅक्स भरावा लागणार नाहीये. हे उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे.

शिष्यवृत्ती आणि सरकारी पुरस्कार
सरकारी संस्थांमधून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. तसेच भारत रत्न, अर्जुन पुरस्कार किंवा राष्ट्रीय पुरस्कारांमधून मिळणाऱ्या रक्कमेवर टॅक्स भरावा लागणार नाहीये.

नातेवाईकांकडून मिळणारे गिफ्ट
नातेवाईकांकडून कोणत्याही सणासुदीला मिळणारे गिफ्ट हे टॅक्स फ्री असणार आहे. लग्नाच्या वेळी मिळणाऱ्या गिफ्टवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाहीये.

HUF मधून सदस्यांना मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री असणार आहे.(money)ग्रॅच्युटीवर काही लिमिटपर्यंत, हॉलिडे कॅश आणि पेन्शनमध्ये काही कॅटेगरीमध्ये टॅक्स भरावा लागत नाही.मेडिकल इन्श्युरन्स प्रिमियम, मील कूपन, ऑफिसमधून फोन किंवा इंटरनेट बिलवर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाहीये.पीपीएफ, एनपीएस, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममधील गुंतवणूकीवर व्याज किंवा मॅच्युरिची अमाउंटवर टॅक्स भरावा लागणार नाहीये.

हेही वाचा :

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार

भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे