भावंडाचा भर भक्कम पाठिंबा मिळेल, परिस्थितीशी दोन हात कराल; ५ राशींचे लोक प्रगतीपथावर वाटचाल करतील

मेष – घराचे व्यवहार करत असाल तर आज जपून करावेत. देवाने(business) भाग्यामध्ये अनेक गोष्टी दिल्या आहेत. पण त्या घेण्याची आपली पात्रता असावी. गणेश उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. लांबचे प्रवास घडतील.

वृषभ – कधी कधी अति हव्यास आणि मनासारख्या गोष्टी करण्यासाठी अट्टाहास असणारी आपली रास आहे. आयुष्यामध्ये मजा करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकता. आज मात्र या(business) आपल्या स्वभावाला आवर घालण्याची गरज आहे.

मिथुन – व्यावसायिक जोडीदार घरातील जोडीदार भावंडांचा आपल्याला चांगलाच पाठिंबा राहणार आहे. मनाने ठरवाल त्या गोष्टी आज लीलाया घडतील. कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळेल.

कर्क – अति भावनिकता आणि साधेपणा कधी कधी अडचणीचे ठरतो. (business) आज मात्र आपला कोण आणि परक कोण हे ओळखून मागण्याचा दिवस आहे. विनाकारण ताणतणाव वाढतील. काळजी घ्या.

सिंह – रवी उपासना विशेष फलदायी ठरेल. आपल्यामधील नवनवीन शिकण्याच्या गोष्टींना आज उभार येईल. वेगळे काहीतरी जगावेगळे करून दाखवण्याची उमेद आज राहील. धन योगाला दिवस उत्तम आहे.

कन्या – सर्वांना जोडून ठेवण्याचे आज काम आपल्याकडून होईल. कुटुंबीय आपला आज वेगळा महत्त्वाच्या गोष्टींसाठी सल्लाही घेतील. बौद्धिक गोष्टींमध्ये अग्रेसर राहाल. जागेचे व्यवहार होतील.

तूळ – बेबनाव आपल्याला आवडत नाही. आज सचोटीने कामे कराल. एक वेगळी जिद्द आणि उमेदीने भरलेला दिवस असेल. न ठरवता सुद्धा काही गोष्टी सहज घडतील. भावंडांना आपल्याविषयी अभिमान वाटेल.

वृश्चिक – जबाबदारीने घरातील कामे तुम्हाला आज पार पाडावी लागतील. कुठेही उगीच घाई करून चालणार नाही. वडिलोपार्जित संपत्तीशी निगडित महत्त्वाचे व्यवहार किंवा निर्णय आज होतील.

धनु – देवाने दिले आहे त्यामध्ये आनंद मानाल. एक वेगळी ऊर्जा आणि आभा घेऊन आज वावराल . काही वेळेला दोलायमान अवस्था होईल. निर्णय घेण्यात आज गडबड करू नका.

मकर – जुन्या गोष्टी उकरून काढून विशेष काही फरक होणार नाही. उगाचच मानसिकता आपली अस्वस्थ राहील. आलेल्या परिस्थितीशी आज दोन हात करा आणि आपले मनोबल सांभाळा.

कुंभ – वायुतत्वाची असणारी आपली रास संशोधनात्मक कार्यात आज प्रगती होईल. प्रेमामध्ये यश मिळेल जवळच्या लोकांच्याकडून शाबासकीची पाठीवर थाप पडेल. दिवस आनंदी आहे.

मीन – कर्माला प्राधान्य देऊन आज वागाल तर दुप्पट चांगली फलित मिळतील. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काहीतरी ध्येय ठेवून आज तुम्ही वागाल. प्रगतीपथावर वाटचाल होईल.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे