‘पुष्पा 2’ सुरू असतानाच चित्रपटगृहात तरुणाचा मृतदेह, तरीही सुरूच होता सिनेमा…

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने(movies near me) बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. अशातच दुसरीकडे ‘पुष्पा 2’ चित्रपटावर संकटांचं ग्रहण लागल्याचं दिसून येत आहे. चाहत्याच्या मृत्यूचे प्रकरण अद्याप शांत झाले नव्हते, तो पर्यंत आता दुसऱ्या चाहत्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

4 डिसेंबर रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका आठवड्यानंतर ‘पुष्पा 2’ च्या स्क्रीनिंगमध्ये आणखी एका चाहत्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये सोमवारी एका शोदरम्यान 35 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याणादुर्गमचे DSP रवी बाबू यांनी सांगितले की, 35 वर्षीय हरिजन मधनाप्पा सोमवारी संध्याकाळी 6 वाजता थिएटरच्या सफाई कर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळले. चित्रपटाचा(movies near me) मॅटिनी शो पाहण्यासाठी तो मद्यधुंद अवस्थेत दुपारी अडीचच्या सुमारास रायदुर्गम येथे गेला होता. परंतु, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप काय आहे हे समजले नाहीये. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी चाहत्याचा मृत्यू कधी झाला आणि कशामुळे झाला यासंदर्भात अजून माहिती दिलेली नाहीये. परंतु, मृत्यू झालेला व्यक्तीला चार मुले आहेत. त्याला दारूचे प्रचंड व्यसन असल्याचे म्हटले जात आहे. तो थिएटरमध्ये देखील नशेमध्ये आला होता. इतकच नाही तर तो थिएटरमध्ये देखील दाऊ घेऊन आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला आहे.

‘पुष्पा 2’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वी 4 डिसेंबरला प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्या महिलेच्या कुटुंबियांची माफी मगत अल्लू अर्जुनने मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा :

हरभजन सिंहचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव!

उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, काळजात ठोका चुकवणारा Video Viral

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘या’ भूमिकेमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार