रेल्वेत नोकरीचं स्वप्न होणार पूर्ण! तब्बल 1 लाख जागांवर मेगाभरती, जाणून घ्या सर्व माहिती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.(recruitment) भारतीय रेल्वे लवकरच तब्बल 1 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. ही भरती 2025-26 आणि 2026-27 या दोन आर्थिक वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने पार पडणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रेल्वेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आता वेळ न घालवता तयारीला लागण्याची ही योग्य वेळ आहे.रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, येत्या दोन वर्षांत दरवर्षी सुमारे 50,000 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी 2024 मध्ये एकूण 1,08,324 पदांची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये 2025-26 मध्ये अर्धी आणि उर्वरित पदांची भरती 2026-27 मध्ये होणार आहे. या माध्यमातून देशभरातील लाखो उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

रेल्वे भरती मंडळ ने गेल्या काही महिन्यांत भरती प्रक्रियेला गती दिली आहे. नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 7 विविध अधिसूचना जारी करून 55,197 पदांसाठी संगणक आधारित परीक्षा घेण्यात आल्या आहेत. या परीक्षांमध्ये 1.86 कोटी उमेदवारांनी सहभाग घेतला. यावरून रेल्वेच्या नोकरीसाठीची स्पर्धा किती तीव्र आहे, हे स्पष्ट होते.या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच 9000 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.(recruitment) त्यामुळे रेल्वे विभाग आपली रिक्त पदे भरण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. उमेदवारांची गुणवत्ता आणि परीक्षेतील पारदर्शकता यासाठी रेल्वे मंडळाने विशेष नियोजन आणि व्यवस्थापन आखले आहे.

रेल्वेच्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोंमध्ये असते.(recruitment) त्यामुळे केवळ पात्रता असून भागत नाही, तर कठोर मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही रेल्वे ग्रुप D, NTPC, JE, ALP अशा विविध पदांसाठी पात्र असाल, तर लवकरच अधिसूचना जाहीर होणार असल्याने तयारीला त्वरित सुरुवात करावी.

हेही वाचा :

YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर

घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे