तर जागीच गेला असता जीव! तरुणांनी गॅस स्टोव्हवर केलं असं काही…; VIDEO पाहून उडेल थरकाप

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, व्हायरल व्हिडिओंसाठी(VIDEO) लोकांचे जीवघेणे स्टंट करण्याचे प्रमाण अत्यंत वाढत चालले आहे. अगदी लहानामुलांपासून ते मोठ्यांपर्यंत स्वत:च्या जीवाचा कोणताही विचार न करता जीव धोक्यात घालून व्हिडिओ बनवत आहेत. विशेषत: तरुणांमध्ये असे स्टंट करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोशल मीडियावर स्टंट करुन इन्फ्लूएंसर होण्याचे अनेकांना वेड लागले आहे.

अशा जिवघेण्यास्टंटमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र तरीही लोक मागचा पुढचा कोणताही विचार न करता सतत स्टंट करत आहेत. सध्या असाच एक जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुणांनी गॅस स्टोव्हवर गॅस पेटवून असे काही केलं आहे की, त्यांचे हे कृत्य पाहून तुमचा थरकाप उडेल. हा व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून हा कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी आणि लाईक्स, व्ह्यूज मिळवण्यासाठी या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. व्हिडिओतमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण किचमध्ये उभे आहेत. त्यातील एकजण गॅसवर चहा बनवत आहे. दुसरा हातामध्ये कोणतातरी स्प्रे घेऊ उभा आहे.

तो गॅस पेटलेला असताना शेगडीवर डिओ स्प्रे करतो. गॅसच्या शेगडीवर स्प्रे करताच असे काही घडलं की पाहून थरकाप उडेल. गॅसवर स्प्रे मारताच आग झटक्यात वाढते. या स्प्रमध्ये असलेल्या ज्वलनशील रासायनिक पदार्थामुळे आग तीव्र भडकते. पण याशिवाय असेही असून शकते की, या तरुणांनी ब्यटेन गॅस स्प्रेचा वापर केला असावा. मात्र, असा स्टंट त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता देखील आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @zydus_wellness या अकाऊंटवर शेअकर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा धोकादायक व्हिडिओ पाहून अनेकांनी तरुणांवर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, खतरों के खिलाडी, तर दुसऱ्या एकाने म्हणूनच मूल खूप कमी जगतात असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

शरद पवारांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

महायुती सरकारने शब्द पाळला; लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता देण्यास सुरूवात

पुढील काही दिवस तापमानात वाढ, कोरडी हवा जाणवेल IMDचा इशारा