Tinder, Bumble वर बनावट प्रोफाइलद्वारे तरुणांची फसवणूक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अ‍ॅप्सवर(profiles) बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत होते. भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळले जात होते.

मुंबई: मुंबई मधून मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. डेटिंग अ‍ॅपवर फेक महिला प्रोफाइल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून(profiles) फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण २२ जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे.

डेटिंग अ‍ॅप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 22 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये, 6 महिलांचाही समावेश आहे. या महिलांच्या(profiles) ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे. ही टोळी Tinder, Bumble, OkCupid, MeetMe यांसारख्या अ‍ॅप्सवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत होते. भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून, हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून तरुणांकडून पैसे उकळले जात होते.

या प्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली होती. फिर्यादी तरुणाची TINDER अ‍ॅपवरून ओळख करण्यात आली त्यांनतर बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात तरुणाला आले. ड्रिंक्सचा बहाणा करत त्याच्याकडून 14,700 रुपये QR कोडद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. त्याला फसवणूक झाल्याचे समजताच त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकून दिल्ली, गाजियाबाद आणि उत्तर प्रदेश येथून आलेल्या 15 पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत 27 मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, स्वाईप मशीन असा 3.74 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी मुंबई, नवी मुंबईसह ठाणे या परिसरात अश्या प्रक्रारे अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं