एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ वेतन, पेन्शनवरही चर्चा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला आहे. महागाईच्या वाढत्या झळांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातही काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या बैठकीत केवळ महागाई भत्त्याचाच निर्णय घेण्यात आला नाही, तर वेतनातील फरक, निवृत्तीवेतन तसेच प्रलंबित भत्त्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेतही बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसटी महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याने कर्मचारी संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात इतर आर्थिक मागण्यांबाबतही निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्राने ५व्या, ६व्या आणि ७व्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ तसेच जानेवारी २०२६ या कालावधीसाठीच्या ८०० कोटी रुपयांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीला मंजुरी दिली आहे. तसेच, सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २% वाढीलाही मंजुरी दिली आहे.

हेही वाचा :

तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी

SBI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा