मध्य मुंबईतील करी रोड परिसरातील धक्कादायक बातमी समोर येत आहे.(area)पोलिसांनी एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. संबंधित वृद्धावर त्याच्या शेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने धाडस दाखवत त्या व्यक्तीच्या कृत्याला मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं. तो व्हिडीओ तिने तिच्या आईला दाखवला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुलीच्या पालकांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली आणि त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी मंगळवारी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या माजी पोस्ट कर्मचाऱ्याला अटक केली. एफआयआरनुसार, आरोपी मे महिन्यापासून हे कृत्य करत होता. एके दिवशी पीडित मुलगी इमारतीतील दुसऱ्या मजल्याच्या कॉमन कॉरिडोरमध्ये उभी होती. तेव्हा आरोपीने तिच्याकडे पाहून अश्लील इशारे केले. (area)इतकंच नव्हे तर जेव्हा ती मुलगी तिच्या शेजारच्यांच्या घरी ट्युशनसाठी गेली, तेव्हा तिथेसुद्धा आरोपी आला होता. त्याने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
पुन्हा जेव्हा आरोपीकडून हेच कृत्य झालं, त्याने अश्लील इशारे केले, तेव्हा मुलीने मोबाइलवर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हाच व्हिडीओ तिने आईला दाखवला. त्यानंतर आई-वडिलांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. (area)याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 आणि 79 आणि लैंगिक अत्याचारांपासून लहान मुलांचं संरक्षण पॉक्सो अधिनियमाअंतर्गत कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे.
हेही वाचा :
पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
SL vs BAN सामना थांबवला, मॅचमध्ये आला खास पाहुणा! मैदानावर गोंधळ, नक्की कारण काय?
वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान