मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? केतकी चितळेचं वादग्रस्त विधान

राज्यात सध्या मराठी(Marathi) विरुद्ध हिंदी भाषा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अशातच अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?” असा प्रश्न तिने उपस्थित करत समाजमाध्यमांवर खळबळ उडवून दिली आहे.

सध्या मनसे, ठाकरे गट आणि इतर स्थानिक पक्ष मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावं, असं वारंवार सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर केतकी चितळे हिचं विधान प्रक्षोभक ठरू शकतं. तिच्या या बोलण्यामुळे मराठीप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण दिसून येत आहे.

“मराठी बोलण्याचा दबाव म्हणजे असुरक्षितता” :
केतकी चितळे म्हणाली की, “कोणी मराठी बोललं नाही म्हणून काही बिघडत नाही. मराठी(Marathi) बोलण्याचा दबाव टाकून स्वतःची असुरक्षितता व्यक्त केली जाते.” तसंच तिने विचारलं की, “समोरची व्यक्ती मराठी बोलली नाही तर त्याने मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का?” तिच्या या विधानाने सामाजिक माध्यमांवर वाद सुरू झाला आहे.

तिच्या विधानावर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तीव्र टीका केली आहे. “केतकी चितळे बोलताना जणू नशेच्या प्रभावात आहे, असं वाटतं. त्या नेहमी अशाच पद्धतीने बोलतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असं ते म्हणाले. मात्र त्याचवेळी त्यांनीही असा सवाल उपस्थित केला की, “मराठी न बोलल्यास भोकं पडत नसतील तर मराठी बोलल्यास भोकं पडतात का?”

भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं :
दवे यांनी केतकी चितळे यांचं विधान केवळ राजकीय असल्याचा आरोप केला आहे. “मराठी(Marathi)-अमराठी वाद उकरून काढून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर, मुंबई उपनगर अशा भागांत मराठी-हिंदी वादामुळे गोंधळ उडालेला आहे. त्यामुळे अशा विधानांनी राज्यात वादग्रस्त वातावरण वाढण्याची शक्यता आहे.

सध्या समाजमाध्यमांवर #KetakiChitale हा ट्रेंडिंग हॅशटॅग असून, अनेकांनी तिच्या विधानावर टीका केली आहे, तर काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंगाने तिच्या समर्थनात प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र अशा संवेदनशील मुद्द्यांवर चर्चेच्या नावाखाली व्यक्तिश: हल्ले टाळणे आणि संयम ठेवणे हे समाजहितासाठी आवश्यक आहे.

हेही वाचा :

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! वर्षातून एकदा मिळणार महिनाभर रजा

महिनाभर दररोज रात्री प्या कोथिंबीरच्या पानांचे पाणी, आरोग्याशी संबंधित ‘या’ 5 समस्या होतील दूर

फाउंडेशन आधी की कंसीलर? परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या योग्य क्रम