सासू-सुनेचं(daughter-in-law) नातं हे जरा आंबट-गोडचं असतं. यात कधी वाद, तंटे, रुसवे-फुगवे आणि प्रेम, काळजी अशा सर्वच गोष्टी घडून येत असतात. सासू सुनेच्या नात्यावर आजवर अनेक मालिका आणि चित्रपट बनले आहेत. यात बऱ्याच एक क्रूर सासू आणि सासूचा जाच निमुटपणे सहन करणारी सून दाखवली जाते पण खऱ्या आयुष्यात मात्र सासू-सुनेचं हे चित्र बरंच बदलून आल्याचं आजकाल दिसून येत आहे.

आता सासू सुनेवर नाही तर घरातील सुनाच(daughter-in-law) सासवांवर दमदाटी करू लागल्या आहेत आणि अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका सुनेने आपल्या सासूला बेदम मारहाण केल्याचे दिसून आले आहे. ती सासूला इतक्या निर्दयतेने मारते की तिच्या चेहऱ्याच्या संपूर्ण नक्षाचा बदलून जातो. चला यात घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटना व्हायरल झाली आहे ज्यात एक सुनबाई(daughter-in-law) सासूचा छळ करत तिला बेदम मारहाण करताना दिसून आली. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील सुनेचं नाव निहारिका जयस्वाल असून तिने आपल्या ७८ वर्षीय सासूवर हल्ला करत तिच्या डोळ्यांचा जोरदार चावा घेतला ज्यामुळे सासूची दृष्टीही जाऊ शकली असती.

माहितीनुसार, या हल्ल्यात सासूचे डोळ्यांना गंभीररीत्या दुखापत झाली असून व्हिडिओत सासू वाईट अवस्थेत जमिनीवर पडल्याचे दिसत आहे तर सून तिथून आपला पळ काढत दुसऱ्या खोलीत जाताना दिसून येत आहे. या घटनेमुळे आता युजर्स चांगलेच संतापले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @thetimespatriot नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “फरशी झाडणारा तो महापुरुष कोण आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ शूट करणाऱ्या माणसाने हे का थांबवले नाही आणि का रोखले नाही?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पोलिस काहीही करत नाहीत आणि कायदाही नाही. कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हाही नाही”.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का; ‘या’ पक्षासोबत युती
मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ
जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करा, राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी…