भारताला मोठा झटका,थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध?

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेची दादागिरी जगात वाढली आहे. एखाद्या देशाने त्यांचे म्हणणे ऐकले (India)नाही की, लगेचच मोठा टॅरिफ लावला जातो. कोणाकडून काय खरेदी करायचे आणि काय नाही हा प्रश्न ज्या त्या देशाचा आहे. पण नाही अमेरिका ठरवणार की कोण कोणत्या देशाकडून काय खरेदी करणार. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यामध्येच अमेरिकेच्या संसदेत मोठे बिल मांडण्यात आले. ज्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर मोठे निर्बंध लादण्याची मागणी करण्यात आली. भारतासोबतच यात अजून काही देशांच्या समावेश आहे. भारत, चीन, स्लोवाकिया, हंगरी आणि अजरबैजान या देशांवर रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 100 टक्के टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याचा मुख्य उद्धेश की, रशियाकडून कोणीही तेल खरेदी करू नये.

हे बिल एप्रिल 2025 सीनेटमध्ये आणले होते. पहिल्या बिलात 500 टक्के टॅरिफचा (India) नाही की,पण प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, त्याला मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे हा टॅरिफ कमी करून 100 टक्के करण्यात आला. भारत, चीन, स्लोवाकिया, हंगरी आणि अजरबैजान हे देश रशियाचे तेल खरेदी करणारे मोठे खरेदीदार आहेत. अमेरिकेने टॅरिफचे शस्त्र येण्यापूर्वी भारत रशियाकडून तेल खरेदीचे रेकॉर्ड तयार करत आहे.

होर्मुज खाडी बंद असल्याने भारताला रशियाकडून तेल (India) खरेदी केल्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने रशियावरील निर्बंध हटवले आहेत. कारण इराण आणि अमेरिका युद्धात जगात ऊर्जेचे संकट निर्माण झाले. त्यामुळे काही दिवसांकरिता रशियावरील तेलाचे निर्बंध अमेरिकेने हटवले.

यापूर्वीही अमेरिकेने भारत (India) हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावला होता. या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात होते. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर हा टॅरिफ कमी करण्यात आला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याबद्दल पाऊले उचलली जात आहेत.

हेही वाचा :

इराणची जगाला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, थेट भारतातही?

सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, रस एकमेव पर्याय, औषधांची गरज नाही?

आषाढी वारीनिमित्त प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय मांसविक्रीवर 15 दिवस पूर्ण बंदी?