भारताने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑकलंड सामन्यात रोहित शर्मा भोपळ्यावर बाद झाला असला तरी विराट कोहलीने दमदार फटकेबाजी केली. (winning) त्यामुळे वेलिंग्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या वन डेत हिटमॅन शो पाहण्याची उत्सुकता आहे. पण, चाहत्यांच्या या उत्सुकतेवर पाणी फिरण्याचा अंदाज आहे. वेलिंग्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या वन डे त पाऊस खोडा घालणार आहे.

शुक्रवारच्या पूर्वार्धात शहरात हलका, संततधार पाऊस पडत असल्याने, दोन्ही संघांना त्यांच्या सरावाच्या वेळापत्रात बदल करावा लागला. न्यूझीलंडने आपला सराव वेलिंग्टन कॉलेजमधील इनडोअर सुविधेमध्ये हलवला, तर भारताने रद्द केला. AccuWeather नुसार, शनिवारी पावसाचा अंदाज असून, (winning) दिवसाच्या पहिल्या भागात पर्जन्यवृष्टीची शक्यता ६०% आणि दुसऱ्या भागात ५५% आहे. ऑकलंडमधील मालिकेतील सलामीच्या सामन्यावरही हवामानाचा परिणाम झाला होता.
भारताने पहिल्या वन डे सामन्यात ५ विकेट्स राखून विजय मिळवला होता. अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार व अंशुल कंबोज यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संघ १८५ धावांवर गडगडला. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर ३२ षटकांत १४३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. भारताने ते २२.४ षटकांत पार केले. विराट कोहलीने ७४ धावांची दमदार खेळी केली, तर शुभमन गिलने ३७ धावा केल्या. (winning) दरम्यान, न्यूझीलंडच्या संघातील दुखापतीचे सत्र कायम आहे. सराव सत्रात जखमी झालेला सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याला संपूर्ण मालिकेतूनच माघार घ्यावी लागली आहे. कॉनवेच्या जागी डावखुरा फलंदाज निक केली याची निवड केली गेली आहे. निकची मूळतः चौथ्या आणि पाचव्या वन डे सामन्यांसाठी निवड झाली होती. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघाचा दुसरा सामना सकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. भारतात सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहाता येईल. तसेच SonyLiv या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहेत.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले
निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा