बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षेला सातत्याने आव्हान दिलं जात आहे. बलोच लिबरेशन(attack) आर्मीने पाकिस्तानच्या सुरक्षा दलावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे 45 हून अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे.बलुचिस्तानचे प्रवक्ता जीयंद बलोच यांनी म्हटलं की, ‘पाकिस्तान सुरक्षा दलावर ‘फतह स्वाड’ने हल्ला केला. पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या अनेक बसवर बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा दावा बलुचिस्तानने केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंकडून बराच वेळ गोळीबार सुरू होता. त्यावेळी केलेल्या बॉम्ब हल्ले केले. त्यात 45 हून अधिक मारले गेले. तर अनेक जण जखमी झाले. आताही लढाई सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आलं आहे.

पाकिस्तान सरकारकडून दुजोरा नाही
बलुचिस्तानच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, ‘या घटनेविषयी (attack) लवकरच सविस्तर माहिती देण्यात येईल. या लढाईत पाकिस्तान सैन्य आणि लष्करी उपकरणांचं मोठं नुकसान झालं आहे. बलुचिस्तानच्या दाव्याला पाकिस्तानी लष्कर आणि सरकारने अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. तत्पूर्वी, गेल्या काही महिन्यात बीएलने बलुचिस्तानमधील पाकिस्तानी लष्कर, निमलष्करी दल आणि सरकारी कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सुरक्षेवर सतत ताण येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सरकारवर दबाव वाढू लागला आहे.
पकिस्तानची चारी बाजूने कोंडी
पाकिस्तानची दिवसेंदिवस परिस्थिती दयनीय होऊ लागली आहे. बलुचिस्तानची(attack) बलोच आर्मी वारंवार पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करत आहे. यामुळे अफगाणिस्तानच्या सीमेवरही तणाव पाहायला मिळत आहे. संयुक्त अरब अमिरातीनेही पाकिस्तानकडे दिलेले कर्ज परत मागितले आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानच्या सेनाप्रमुख मुनीर यांच्यावर मोठं संकट उभं ठाकलं आहे. तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील लोकांचा असंतोष वाढत आहेत. पाकिस्तानच्या सीमा भागात आंदोलने अधिक तीव्र झाली आहेत. महाग वीज, अन्नधान्याची कमतरतेवरुन लोकांमध्ये नाराजी वाढत आहे.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?