दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासाठी हजारो लोक जमू लागले.(Thalapathy) या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दिल्लीतील आंदोलनस्थळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनीही भेट दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री विजय हे एका कारमध्ये आहेत. त्यांच्या कारजवळ तरुणाचा गराडा पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर आलं आहे.

थलपती विजय यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत(Thalapathy) आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून थलपती विजय यांनी आंदोलनाला समर्थन दिल्याचा दावा केला जात आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओविषयी महत्वाची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, ‘सोशल मीडियावर मुख्यमंत्री थलपती विजय यांचा हा व्हिडिओ खोटा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री थलपती विजय हे रात्री आंदोलनस्थळी गेले नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
कॉकरोच जनता पार्टीचं 20 जूनपासून(Thalapathy) जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाच्या माध्यमातून नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे. या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी जंतर-मंतरवर पोहोचून पाठिंबा दिला आहे
आज संसदेवर मोर्चा
कॉकरोच जनता पक्षाने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यात आज संसदेच्या(Thalapathy) पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस देखील अलर्ट मोडवर आहे. तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. त्यांचं रुग्णालयातूनही उपोषण सुरू असल्याची माहिती मिळतेय. त्यांची पत्नी गितांजली यांनी आज घोषणा केली आहे की, संसदेत विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणी आवाज उचलल्यास सोनम हे उपोषण सोडतील’.
हेही वाचा :
शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?
12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?