कुरुंदवाड परिसरातील एका शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिक्षक अजित दिवटे याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २३ जून २०२६ रोजी शाळेत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा होत असताना शिक्षकांकडून चॉकलेटचे वाटप सुरू होते. (teacher) त्यावेळी संबंधित विद्यार्थिनी संगणक कक्षात गेली असता शिक्षकाने तिला थांबवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. (teacher) त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी संबंधित शिक्षकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याचीही चर्चा परिसरात आहे. तसेच या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे संबंधित गावात संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, (teacher) शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे..
हेही वाचा :
झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?