नवी दिल्लीतील आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत.

नवी दिल्लीत आंदोलनाचा भडका उडाला आहे. जंतरमंतरवर मध्यरात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या हिंसक घटनेत आंदोलकांसहित पोलीस अधिकारी देखील जखमी झाले. (stations) त्यानंतर आज गुरुवारी देशासहित विविध भागात आंदोलन पेटलं आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या पार्श्वभूमीवर शहरातील 16 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रो स्टेशनच्या आवारात कडक सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आल्याची माहिती मिळतेय. काँग्रेस आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत.
नवी दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद राहणार आहेत. (stations) यात लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखम्बा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालाय, ITO, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ ,खान मार्केट, जोर बाग, शिवाजी स्टेडियम या मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करणे टाळणे फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या मेट्रो स्टेशनवर एन्ट्री आणि एक्झिट बंद असणार आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने ‘एक्स’वर पोस्ट करत मेट्रो स्टेशन बंद करण्याची माहिती दिली आहे. सर्व मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची आदेश देण्यात आले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसद भवनापर्यंत पोहोचणाऱ्या मार्गावरील मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनामुळे पावसाळी अधिवेशनातील राजकीय नेतांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे कायदा व्यवस्था बिघडली आहे. सुरक्षेच्या कारणात्सव मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, कॉक्रोच जनता पक्षाने 20 मार्च रोजी संसदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. (stations) यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या देखील फोडल्या होत्या. तर काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वात पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासहित इतर आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं.
हेही वाचा :
हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?