आयपीएल 2027 स्पर्धेला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. मार्चमध्ये या स्पर्धेला सुरूवात होणार असून मिनी लिलावाची उत्सुकता आहे. हा लिलाव भारतात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

आयपीएल चाहत्यांसाठी आणि सर्व फ्रँचायझींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी आयपीएल 2027चा लिलाव यावेळेस भारतातच आयोजित केला जाणार आहे. 15 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या आयपीएल नियामक परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून देशाबाहेर होणारा खेळाडूंचा लिलाव आता पुन्हा एकदा मायदेशात होणार आहे. भारतात शेवटचा आयपीएल लिलाव 2023 मध्ये कोची येथे पार पडला होता. (IPL 2027) त्यानंतरचे सलग तीन लिलाव भारताबाहेर म्हणजेच दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले होते.
हा लिलाव याच वर्षी डिसेंबर 2026 मध्ये पार पडणार असून तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर हा लग्नाचा हंगाम असल्याने, फ्रँचायझींच्या सर्व सोयीसुविधा आणि पंचतारांकित हॉटेल्सची उपलब्धता पाहून नियामक परिषद लवकरच लिलावाच्या भारतीय शहराची घोषणा करेल. हा ‘मिनी’ लिलाव असल्याने संपूर्ण संघ बदलणार नाही, तर फक्त रिकाम्या जागा भरल्या जातील. (IPL 2027) त्यामुळे केकेआर आणि सीएसके सारखे मोठे बजेट असलेले संघ उपलब्ध स्टार खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडू शकतात. आयपीएल 2027 च्या मिनी लिलावासाठी सध्या कोलकाता नाइट रायडर्सकडे 64.3 कोटी आणि चेन्नई सुपर किंग्सकडे 43.4 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे.
आयपीएल 2027 च्या मिनी लिलावाबरोबरच, पुढील वर्षाच्या म्हणजेच आयपीएल 2028 च्या मेगा लिलावाबाबतही एक मोठी अपडेट समोर आली आहे. 2028 चा मेगा लिलाव हा परदेशात आयोजित केला जाईल, (IPL 2027) यावर नियामक परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती ‘क्रिकबझ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.15 सप्टेंबरच्या या बैठकीत लिलावाच्या ठिकाणांवर निर्णय झाला असला, तरी क्रिकेट जगतात वादग्रस्त ठरलेला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम चालू ठेवायचा की नाही, हा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या नियमावर फ्रँचायझी आणि खेळाडूंची मते जाणून घेतल्यानंतर, नियामक परिषदेच्या पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?