ईडी, सीबीआयच्या कारवाईची भीतीपोटी साखर कारखानदार धुराडी पेटवण्याच्या तयारीत राजू शेट्टी यांची टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी साखर कारखानदारांवर कठोर शब्दांत टीका करत कारखाने लवकर सुरू करण्यामागे ईडी आणि सीबीआयच्या कारवाईची भीती असल्याचा गंभीर आरोप केला. सरकारच्या दबावाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठीच कारखानदार धुराडी पेटवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे

कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात आज आठ टक्क्यांपेक्षा जास्त साखर उतारा देणारा ऊस उपलब्ध नाही. १२ ते १३ टक्के उतारा अपेक्षित असताना केवळ आठ टक्के उताऱ्याचा अपरिपक्व ऊस गाळल्यास रिकव्हरी आणि वजन घटून शेतकऱ्यांचे एकरी मोठे नुकसान होणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये उतारा चांगला मिळतो. (Raju Shetty) त्यामुळे गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू झाला पाहिजे.

मात्र, केंद्र सरकार सणासुदीच्या काळात बाजारात नवीन साखर आणून साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी कारखानदारांवर दबाव आणत आहे, शेतकरी आणि कारखानदारांनी तोटा सहन करायचा आणि केंद्राने बाजारासाठी साखर उपलब्ध करून घ्यायची हे मान्य नाही. शेट्टी यांनी आरोप केला की अनेक साखर कारखानदारांवर ईडी सीबीआयच्या चौकशा सुरू आहेत. (Raju Shetty) त्या चौकश्यांपासून वाचण्यासाठी आणि सरकारला खुश ठेवण्यासाठी सरकारधार्जिणे कारखानदार आंदोलन मोडीत काढण्यासाठी आगाऊपणा करून कारखाने सुरू करत आहेत. ऊस दराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काटा बंद आंदोलन छेडले जाईल, अजिंक्यतारा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास सातारा जिल्ह्यातील एकही कारखाना चालू देणार नाही.

वेळप्रसंगी रस्त्यावर गाड्या अडवू रोक सको तो रोक लो, पण धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नाही. कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या आठ वर्षांपासून साखरेची एमएसपी ३१०० रुपये क्विंटलवर स्थिर आहे. खते, बियाणे, मजुरी, वाहतूक खर्च वाढला आहे. एफआरपी वाढत असल्यामुळे कारखाने कर्ज काढून एफआरपी देत आहेत.म्हणून साखरेचा किमान विक्री दर ५० रुपये किलो आणि सी हेवी इथेनॉलचा दर ७० रुपये प्रति लिटर करावा, तसेच शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे आणि उसाला ५००० रुपये दर जाहीर केल्याशिवाय धुराडी पेटवू नये.

१२ ऑक्टोबरला दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक होणार असून तोपर्यंत कारखाने सुरू करू नयेत असे आश्वासन जोशी यांनी दिले होते, त्या बैठकीत मिळणारा प्रस्ताव जयसिंगपूर आणि कर्नाटकातील गुरलापूर येथील २५ व्या ऊस परिषदेत ठेवला जाईल आणि (Raju Shetty) त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली तरच कारखाने सुरू होतील अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली आहे.

हेही वाचा : 

राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा

MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू