भारत श्रीलंका कसोटी सामना नुकताच पार पडला. या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला आहे. आता भारतीय संघ थेट तीन महिन्यांनी कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. (Indian team) त्यामुळे या संघात काही बदल होण्याची दाट शक्यता आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी टीम इंडियासाठी आता करो या मरोची स्थिती आहे. आता भारताचे सात कसोटी सामने शिल्लक असून प्रत्येक सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पण क्लिन स्विप देण्याची संधी हुकली. शुबमन गिलच्या नेतृत्वात हा पहिला विदेशी भूमीवरील विजय ठरला आहे. आता तीन महिन्यांनी भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. (Indian team) त्यामुळे श्रीलंका दौऱ्यातील चार खेळाडूंची पत्ता या संघातून कापला जाण्याची शक्यता आहे. भारताचा पुढचा कसोटी दौरा न्यूझीलंडला असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून एक कठीण दौरा असणार आहे.
भारतीय संघ सहा वर्षानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यात भारतीय संघातील बहुतांश खेळाडू न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदाच खेळणार आहेत. त्यामुळे अनुभवाची उणीव असणार आहे. कर्णधार शुबमन गिल देखील न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा दौरा वाटतो तितका सोपा नाही. कारण न्यूझीलंडमधील स्थिती फार वेगळी आहे. अशा स्थितीत श्रीलंका दौऱ्यातील चार खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडमधील स्थिती, श्रीलंकेतील कामगिरी आणि काही खेळाडू दुखापतीतून सावरल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडमधील वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च येथे कसोटी मालिका खेळली जाणार आहे. इथल्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या आहेत. (Indian team) त्यामुळे संघात वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिलं जाईल यात काही शंका नाही. त्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादव आणि कोलंबो कसोटीत पदार्पण करणारा सारांश जैन यांना आराम दिला जाईल. कारण भारतीय संघात दोन फिरकीपटू आहेत. रवींद्र जडेजा आणि मानव सुथार फिरकीची धुरा सांभाळतील. त्यात वॉशिंग्टन सुंदर संघात परतण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी फिट अँड फाईन असेल. त्यामुळे या मालिकेतील दोन सामन्यासाठी त्याचा विचार केला जाईल. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा संघात असतील. चौथा वेगवान गोलंदाज म्हणून गुरनूर ब्रारला संधी मिळेल. इतकंच काय तर हर्षित राणा फिट होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे आकिब नबीला संधी मिळणं कठीण आहे. त्यामुळे त्याला या दौऱ्यातून वगळलं जाऊ शकतं. सरफराज खानची श्रीलंका दौऱ्यासाठी साई सुदर्शनच्या जागी निवड झाली होती. पण न्यूझीलंडमधील स्थिती फलंदाजीसाठी वेगळी आहे. स्विंग आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर सरफराज खान तग धरणं कठीण मानलं जातं. त्यामुळे त्याच्या जागी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीची निवड होऊ शकते. कारण मध्यम गतीने गोलंदाजी करून संघासाठी योगदान देऊ शकतो.
हेही वाचा :
अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?
सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?
एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?