इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा टीम इंडियाच्या (Team India) जर्सीत एकत्र कधी खेळताना दिसणार? दोघांनीही आता केवळ वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या पुढील सामन्याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, त्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इंग्लंड मालिकेनंतर पुढचा वनडे दौरा कधी भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत भारतीय संघाला 1-2 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांच्या या मालिकेत अखेरच्या लढतीत भारताने 387 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 360 धावांपर्यंत मजल मारली, मात्र 27 धावांनी सामना गमावला. संघाला विजय मिळवता आला नसला तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या फलंदाजीने पुनरागमनाची झलक दाखवली.
मालिकेतील शेवटच्या वनडेत रोहित शर्माने 110 चेंडूत 138 धावांची दमदार खेळी केली, तर विराट कोहलीने 60 चेंडूत 74 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. दोघांनीही टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर दिले. (Team India)यापूर्वी दोघांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून एकाच वेळी निवृत्ती घेतली असून आता ते केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2027 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेवर लक्ष ठेवून ते जास्तीत जास्त वनडे सामने खेळण्यास प्राधान्य देत आहेत.
वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड दौरा ठरणार महत्त्वाचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघाचा पुढील वनडे कार्यक्रम सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकत्र मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांना सुमारे दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. वेस्ट इंडिज संघ 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान भारत दौऱ्यावर येणार असून या मालिकेत तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 27 सप्टेंबरला तिरुवनंतपुरम , दुसरा 30 सप्टेंबरला गुवाहाटी आणि तिसरा 3 ऑक्टोबरला न्यू चंदीगड येथे होणार आहे.
या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात पाच वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकांमधील कामगिरीच्या आधारे संघबांधणीला वेग मिळण्याची शक्यता आहे. (Team India) त्यानंतर डिसेंबरमध्ये श्रीलंकासंघ भारत दौऱ्यावर येणार असून तीन सामन्यांची आणखी एक वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?