दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टी यांच्या संसद मोर्चादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांना संसदेकडे जाण्यापासून रोखताना दिल्ली पोलीस यांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही मेट्रो स्थानकांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (Parliament) तसेच इंटरनेट सेवांवरही मर्यादा आणण्यात आल्याची माहिती आहे.

संसद मोर्चादरम्यान पोलिसांची कारवाई पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीने केली होती. (Parliament) त्यानुसार जंतरमंतर येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते एकत्र आले. आंदोलक संसदेकडे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र आंदोलक पुढे सरकण्याचा प्रयत्न करत राहिल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.यावेळी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे. जंतरमंतर परिसरातच आंदोलन अधिक तीव्र झाले. या घटनांमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.अनेक नेत्यांची उपस्थिती, वाहतूक आणि मेट्रोवर परिणाम या संसद मोर्चात आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया , संजय सिंह , आझाद समाज पार्टी चे प्रमुख तसेच खासदार चंद्रशेखर आझाद, अभिनेते प्रकाश राज आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नींसह अनेक जण सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सरकार युवकांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला. युवकांच्या हक्कांसाठी आणि (Parliament) त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी आपण या आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने काही मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि निर्गमन तात्पुरते बंद ठेवण्याची तयारी केली होती. विविध स्थानकांवर पोलिसांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली असून परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवांवरही निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?