‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले?

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबालने या सिरिजबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, तारखेमध्ये बदल केला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

आगामी काळात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात बांग्लादेश आणि भारत यांच्यात सिरिज होणार होती. मात्र आता ही सिरिज सुरू होणार की नाही याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात सप्टेंबर महिन्यात तीन वनडे सिरिज आणि टी २० सिरिज खेळवली जाणार होती, मात्र आता हा दौरा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Team India) याबाबत बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. राजकीय तणाव आणि भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक यामुळे हा दौरा कदाचित रद्द किंवा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये नियोजित असलेला हा दौरा आता सप्टेंबर महिन्यापर्यन्त पुढे गेला होता. मात्र अद्याप बीसीसीआय आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डामध्ये एकमत झाले नसल्याचे समजते आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबालने या सिरिजबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, तारखेमध्ये बदल केला जाऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. या सिरिजसंदर्भात बीसीसीआय आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डात बोलणी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

भारत आणि बांग्लादेश सिरिजमध्ये आणखी देखील काही समस्या असल्याचे म्हटले जात आहे. बांग्लादेशने गेम डेवलपमेंट सिरिजची घोषणा केली आहे. ही सिरिज २८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. (Team India) त्यामुळे भारत बांग्लादेश सिरिज पुढे ढकलली जाऊ शकते. गेम डेवलपमेंट सिरिज मीरपूरमध्ये खेळवली जाणार आहे. जर भारत बांग्लादेश सिरिज होणार असल्याचे स्पष्ट झाले तर या सिरिजचे ठिकाण मीरपूरवरून दुसऱ्या ठिकाणी बदलले जाऊ शकते, असे इकबाल यांनी सांगितले.

भारत आणि बांग्लादेशच्या दौऱ्यात तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याबाबत शंका निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यात मिडिया राईट्स विक्रीच्या प्रक्रियेवर अचानक बंदी आणल्याचे समजते आहे. (Team India) याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने 2026-27 च्या प्रस्तावित दौऱ्यासाठी मीडिया राईट्ससाठी टेंडर काढण्याचे जाहीर केले होते. ज्यामध्ये भारत अन् बांग्लादेश मालिकेचा समावेश होता.

हेही वाचा :

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

RBI च्या नव्या नियमांमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार?

दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही?