हार्दिक पंड्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे

आशिया कप 2025 मध्ये आता एक महिन्यापेक्षा सुद्धा कमी वेळ शिल्लक आहे. गतविजेता टीम इंडिया पुन्हा एकदा आशिया कप चॅम्पियनचा खिताब जिंकण्यासाठी प्रयत्न करणार करेल. पण या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट(sports news) कंट्रोल बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटची नजर ही फक्त नेट प्रॅक्टिस किंवा रणनीतीवर नाही तर खेळाडूंच्या फिटनेस रिपोर्टकडे सुद्धा लागल्या आहेत. विशेषतः हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यासारख्या महत्त्वाच्या खेळाडूंची तंदुरुस्ती संघाचं संतुलन आणि रणनीती ठरवण्यात मोठी भूमिका बजावणार आहे.

हार्दिक पंड्या पास होणार की फेल?
भारतीय ऑलराउंडर हार्दिक पंड्यासाठी(sports news) पुढील 48 तास हे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचा फिटनेस टेस्ट 11 आणि 12 ऑगस्ट रोजी NCA बंगळुरूमध्ये होणार आहे. हार्दिक पंड्या एनसीएमध्ये पोहोचला असून सोशल मीडियावरून त्याने फॅन्सला याबाबतची माहिती सुद्धा दिली होती. तेव्हा आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की फिटनेस टेस्ट पास करण्यात तो यशस्वी होतो की नाही.

श्रेयस अय्यरने आधीच दिली टेस्ट :
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 27 ते 29 जुलै दरम्यान श्रेयसची टेस्ट झाली असून यात तो पास झाला हे. श्रेयसने 2023 मध्ये शेवटचा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पण आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्याने आशिया कप 2025 च्या संघात त्याचं पुनरागमन निश्चित मानलं जातंय.

सूर्यकुमार यादव रिकव्हरी मोडमध्ये :
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची स्थिती थोडी वेगळी आहे. तो आता पूर्णपणे फिट नाहीये. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. सध्या तो NCA मध्ये मेडिकल स्टाफ आणि फिजियोच्या निरीक्षणाखाली आहे. जूनच्या सुरुवातीला त्याचं हार्नियाचं ऑपरेशन झालं होतं, त्यानंतर तो सध्या रिहॅबमध्ये आहे.

आशिया कपला कधी होणार सुरुवात?
आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबर पासून होणार असून याचा फायनल सामना हा 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाच्या अधिकृत संघाची घोषणा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्यापूर्वी सर्व खेळाडूंनी फिटनेस टेस्ट पास करणं महत्वाचं आहे. 14 सप्टेंबर रोजी भारताचा ग्रुप स्टेज सामना पाकिस्तान सोबत होणार आहे.

हेही वाचा :

‘…..तर थेट कारवाई करू’; महाविद्यालयांना मोठा झटका

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी

“आता रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ…; सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’