मंत्री छगन भुजबळ यांनी दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाष्य केले. अभिजीत दिपके यांच्याकडून दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर आता भुजबळांनी मोठे विधान केले.

मंत्री छगन भुजबळ यांनी अंगणवाडी सेविकेच्या निलंबनावर मोठे विधान केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, काही कल्पना नाही. असे चुकीचे प्रकार होत असतील तेही लहान मुलांच्या बाबतीमध्ये याबद्दल तक्रार आली चौकशी झाली पाहिजे. तक्रार करणाऱ्यावरच कारवाई करणे हे योग्य आहे असं मला वाटत नाही. नाना पटोले यांच्या नोटीसवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, दीड हजार, दोन हजार जी काही मिळत. दोन महिला असतील तर एका घरामध्ये तीन हजार रुपये मिळत महिन्याला त्यांना जाऊन विचारा ते किती आनंदित आहेत. जे काही महिन्याला मिळताय, (resignation) त्यामध्ये 3 हजारची भर पडत असेल त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे. त्याचा कुठे काय संबंध आहे.
भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदाबद्दल बोलताना भुजबळांनी म्हटले की, चांगली गोष्ट आहे ना..सगळ्यांनीच समजूतदारपणाने वागलं पाहिजे. जिथे आपलं अलायन्स आहे. तिथे समजूतदारपणा कोणीतरी दाखवायला पाहिजे तरच महायुतीची गाडी पुढे चालेल चांगली गोष्ट आहे. विकास घुले हत्या प्रकरणात बोलताना त्यांनी म्हटले की, मला याची कल्पना नाही. मात्र, पोलिसांनी याची नोंद घेतली पाहिजे.जे कोणी आरोपी असतील त्यांना बेड्या ठोकल्या पाहिजे. दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दिपके यांनी केली. (resignation) त्यावर बोलताना भुजबळांनी म्हटले की, लोकशाहीमध्ये कोणी काय बोलावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. दादा भुसे हे काम करत आहेत आणि हजारो शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत. सर्व ठिकाणी सर्व काही व्यवस्थित आहे असा माझा सुद्धा दावा नाही.काही ठिकाणी इमारत दुरुस्ती असेल काही ठिकाणी शिक्षकांची कमतरता असेल. आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे, या शिक्षणावर राज्य सरकार प्रचंड खर्च करते. त्यातूनही काही ठिकाणी उणीवा असतात, त्या उणीव दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. साखर आणि तेलाच्या वाढलेल्या किमतीवर भुजबळांनी म्हटले की, माझ्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं तरी असलं तरी तुम्ही सांगत असलेले विषय माझ्याकडे येत नाही.
माझ्याकडे भारत सरकार गहू, तांदूळ पाठवते जवळजवळ 54 हजार दुकानांमधून 7 कोटी लोकांना पुरवठा केला जातो. भाववाढीचा जो प्रश्न आहे त्यात मंत्रिमंडळ विचार करेल. जिथे खर्च आहे ती गोष्ट आम्हाला बाहेर बोलता येणार नाही. (resignation) एखादी घोषणा करण्याआधी फायनान्समध्ये चर्चा करून करावी अशा सक्तआदेश आम्हाला दिले आहेत आणि ते खरे आहेत.आपण काही जरी बोललो घोषणा केली. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागणारच आहेत. घोषणा केली तर ती पूर्ण झाली पाहिजे. लासलगावमध्ये ग्रुप बाजी आहे त्यांच्यामध्ये समझोता होण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र काही वेळा ते फेल झाले. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जात. गिरीश महाजन मनमानी कारभार पृथ्वीराज चव्हाण आरोपांवर भुजबळांनी म्हटले की, मी त्यावर काय सांगणार…ज्यांच्यावर आरोप केला ते दुसरे ज्यांनी केला ते दुसरे… मी तिसरामध्ये मेरा चांद मी काय सांगणार त्यात तुम्ही त्यांनाच विचारा..
हेही वाचा :
शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?