टीम इंडिया विरुद्ध टी 20i मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, चौथ्या स्थानी भारताचा जावई?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेला 1 जुलैपासून सुरुवात होत असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या बहुचर्चित मालिकेकडे लागले आहे. दोन्ही संघांमधील लढती नेहमीच रंगतदार ठरल्या आहेत. या निमित्ताने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी फलंदाजांवर एक नजर टाकूया.

या यादीत इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलर अव्वल स्थानावर आहे. बटलरने भारताविरुद्ध खेळलेल्या 28 टी-20 सामन्यांतील 25 डावांत 669 धावा केल्या आहेत. (cricket) त्याची सरासरी 31.85 असून या काळात त्याने पाच अर्धशतके झळकावली आहेत. भारताविरुद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर आहे. मिलरने भारताविरुद्ध 29 सामन्यांतील 26 डावांत 626 धावा करत अनेक वेळा सामना फिरवणाऱ्या खेळी केल्या आहेत. डेथ ओव्हर्समध्ये त्याची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरली आहे.

या यादीत तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार निकोलस पूरन आहे. पूरनने भारताविरुद्ध 20 टी-20 सामन्यांत 592 धावा केल्या असून त्याची सरासरी 32.88 इतकी आहे. फिरकी गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो.चौथ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आहे. मॅक्सवेलने भारताविरुद्ध 24 टी-20 सामन्यांतील 22 डावांत 576 धावा केल्या आहेत. आपल्या अनोख्या फटकेबाजीमुळे (cricket) त्याने अनेक वेळा भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली आहे.

पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर क्विंटन डी कॉक आहे. डी कॉकने भारताविरुद्ध 16 सामन्यांतील 15 डावांत 513 धावा केल्या आहेत. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला आहे. (cricket) भारताविरुद्ध सातत्याने मोठ्या धावा करणाऱ्या या फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. आगामी सामन्यांमध्ये या आकडेवारीत आणखी बदल होतो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?