भुदरगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी चोपले. गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघातील तालुक्यात ही घटना घडली. (Raju Shetty) असून त्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
भुदरगड तालुक्यातील म्हसवे गावात आज मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रशासनामार्फत शक्तीपीठ महामार्गाचे मॅपिंग करण्याचे काम सुरू होते. संतप्त गावकऱ्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना चोप दिला. काही गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. (Raju Shetty) यावरून शक्तीपीठची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांनो तुम्हाला २४ तास पोलिस संरक्षण असणार नाही, शेतकऱ्यांच्याबरोबर वैयक्तिक दुश्मनी घेऊ नका असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

म्हसवे गावात आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रशासनामार्फत शक्तीपीठ महामार्गाचे मॅपिंग करण्याचे काम सुरू होते. सकाळी ही बाब गावातील नागरिकांच्या निदर्शनास आली. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या कामाला तीव्र विरोध केला.यावेळी संतप्त शेतकरी आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला. परिस्थिती तणावपूर्ण बनली . यावेळी मॅपिंगसाठी वापरण्यात आलेल्या मशीन व वाहनांचे नुकसान करण्यात आले. तसेच मोनार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले.
अखेर गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगचे काम पूर्णपणे बंद पाडले. प्रशासनाच्या पथकाला गावातून माघारी जाण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांचा ठाम निर्धार आमच्या जमिनी, आमचा हक्क, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही मोजणी नको अशा घोषणा देण्यात आल्या.शक्तीपीठची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांनो तुम्हाला २४ तास पोलिस संरक्षण असणार नाही, शेतकऱ्यांच्याबरोबर वैयक्तिक दुश्मनी घेऊ नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शक्तीपीठ महामार्गाला भुदरगडसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे कारण या महामार्गामुळे सुपीक शेती, बागायती जमिनी, घरे, विहिरी, पाईपलाईन आणि पिढ्यानपिढ्या जपलेली शेती उद्ध्वस्त होणार आहे आणि शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांच्या संमतीशिवाय मोजणी आणि मॅपिंगचे काम सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Raju Shetty) त्यामुळे पहाटेच्या अंधारात गुपचूप मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला पाहताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण शेतकरीही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले .आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, बळजबरीने मोजणी करण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या घटनेनंतर म्हसवे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता प्रशासनाने पुन्हा मोजणीसाठी येऊ नये असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी आंदोलनाला पुन्हा एकदा धार आली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय