‘वारणा’ची म्हैस दूध खरेदीत प्रतिलिटर दीड रुपया गाय दुधास १ रुपया दरवाढ?

कोल्हापूर वारणानगर येथील वारणा दूध संघाने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे, तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया वाढ केली आहे. (cow milk) तसेच, म्हैस दूध विक्री दर प्रतिलिटर २ रुपये दरवाढ केली आहे, ही माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी आज दिली. ही दरवाढ मंगळवार (११ ऑगष्ट ) पासून लागू होणार आहे. आमदार कोरे म्हणाले, की शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून आता म्हैस दूधाच्या ६.० फॅट व ९.० एस.एन. एफ. ला खरेदीरात प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे, तर गाईच्या ३.५ फॅट. व ८.५ एस.एन.एफ च्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर १ रुपया वाढ केली आहे.

म्हैस दुधाच्या विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ मंगळवार, ११ ऑगस्ट पासून लागू होणार असल्याचे अध्यक्ष एच. आर. जाधव आणि कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगीतले. सध्या संघाकडील दूध व दुग्धजन्य पदार्थाना वाढीव मागणी प्राप्त झाली आहे. संघाची दही, तूप,पनीर,लस्सी, ताक, इत्यादी पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. संघाने अल्पदरात पशु वैद्यकीय सेवा,अमृत पशुधन सुरक्षा कवच योजना, रेडी संगोपन योजना,जातिवंत म्हैस संवर्धन योजना,इतर अनुदान पर योजना तसेच दिवाळीत फरक बिल या सारखे उपक्रमाच्या माध्यमातीन अधीकाअधिक परतावा दूध उत्पादकांना देण्याची वारणाची परंपरा राहिली आहे, असे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले. (cow milk) यावेळी उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील,अकौंटस मॅनेजर प्रविण शेलार, संकलन व्यवस्थापक डॉ. जे. बी. पाटील, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले उपस्थित होते.

वारणा संघाच्या प्रतिदिन दूध ५० हजार लिटर, दही विक्रीत १५ टनाने वाढ, पनीर मध्ये ५ ते ६ टनाने वाढ झाली आहे. वारणाने शुद्धता व दर्जामध्ये कधीही तडजोड केलेली नाही. सध्या वारणाच्या दूधात पूर्वीच्या विक्रीपेक्षा गेल्या दोन महिन्यात तब्बल प्रतिदिन ५० हजार लिटर ची विक्रीवाढ झाली आहे. (cow milk) तसेच पनीर मध्ये प्रतिदिन ५ ते ६ टन, दही १५ टन वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक दही विक्री झाल्याचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले. वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ’ ची स्थापना १९६८ मध्ये सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा नगर येथे केली. हा संघ महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि यशस्वी सहकारी दुग्ध प्रकल्प असून, याद्वारे लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. पक्के पाश्चराइज्ड दूध, टेट्रा पॅक दूध, तूप, लोणी, चीज, पनीर, श्रीखंड, ताक, दही, लस्सी आणि दूध पावडर. यातील ‘वारणा श्रीखंड’ संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांपैकी एक आहे.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?