मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण येत असल्याचं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं होतं. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला होता. (Ladki Bahin) आता यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट सरकार ही योजना आणखी मजबूत करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नागपूरजवळच्या कोराडी इथल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी योजनेबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यावर आर्थिक ताण येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण हा ताण कमी करण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये आहे, असं ते म्हणाले.यंदा दुष्काळी परिस्थिती असली तरी सरकार त्यातून मार्ग काढेल. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. उलट ही योजना जास्त मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासनही बावनकुळे यांनी दिलं.सध्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांमध्ये ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न पडला आहे. (Ladki Bahin) आता नोव्हेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र सरकारकडून यासंदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही.
दुष्काळामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतोय.(Ladki Bahin) काही ठिकाणी बोअरवेल खोदण्यासाठी आणि पाण्याच्या टँकरसाठी जास्त पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. यावर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. बोअरवेल खोदण्यासाठी ७० हजार रुपयांच्या कामाचं काही व्यावसायिक १ लाख २० हजार रुपये मागत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बोअरवेलचे दर ७० हजार रुपयांच्या पुढे जाऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. टँकरचालकांनीही नागरिकांकडून जास्त पैसे घेऊ नयेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय