कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक बनली आहे. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे महापालिकेने सोमवार (२२ जून) पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. (Water) सध्या शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी या पर्यायी उपसा केंद्रांमधून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या आठवड्यात नद्यांमधील पाण्याची पातळी लक्षणीय घटल्याने सर्व उपसा केंद्रे बंद पडली होती. परिणामी शहरातील अनेक भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने ५ हजार ते २५ हजार लिटर क्षमतेचे २८ खासगी टँकर भाड्याने घेऊन पाणीपुरवठा केला होता.दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पर्यायी व्यवस्थेवरही संकटाची छाया दिसू लागली आहे. कळंबा तलावातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असल्याने या स्रोतावर आधारित पाणीपुरवठा योजना पुढील दोन दिवसांत बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Water) त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे.
तथापि, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सध्या सुरळीत सुरू असल्याने खासगी भाडेतत्त्वावरील सर्व २८ टँकरची सेवा थांबवण्यात आली आहे. पुढील काळात गरज भासल्यास महापालिकेच्या स्वतःच्या चार टँकरद्वारे मागणीनुसार पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.मान्सूनचा पाऊस अपेक्षित प्रमाणात झाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, (Water) मात्र तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?