विधान परिषद निवडणूक अपेक्षित, अनपेक्षित निकाल?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

या निवडणुकीत मतदानासाठी पात्र असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी यांना निवडून येण्यासाठी पैसा खर्च करावा लागलेला असतो. त्याची किमान भरपाई व्हावी असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे आणि म्हणून ते त्यांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असला तरी, त्यांना विधान परिषद उमेदवाराकडून पैशाची अपेक्षा असते आणि त्याची पूर्तता कमी अधिक प्रमाणात केली जाते. या निवडणुकीत प्रत्येक मताचे मूल्य ठरवलेले असते. निवडून येण्याइतके संख्याबळ असले तरी उमेदवाराला पैसे द्यावेच लागतात. (election) त्यातही निवडून येण्यासाठी विरोधी पक्षातील मतदारांनाही पैशाचा वापर करून फोडले जाते. नाशिक विधान परिषद मतदार संघात असाच घोडेबाजार झालेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि म्हणूनच महायुती मधील मते मोठ्या प्रमाणावर फोडून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडून आले आहेत.

या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांना महायुती मधील मतदारांनीच धक्का दिला आहे.अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असे वातावरण आहे.(election) तसे झाले तर आम्ही ठाकरे गटाची मते गोकुळ गीते यांच्याकडे वळवली असा दावा करणाऱ्या संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय असेल?स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ असलेल्या विधान परिषदेच्या एकूण 17 जागापैकी 16 जागांवर महायुतीने अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला आहे तर नाशिक स्थानिक स्वराज्य मतदार संघात महायुतीसाठी अनपेक्षित निकाल लागला असून अपक्ष उमेदवार असलेल्या गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात आघाडी धर्म अगदी उघडपणे पाळला गेलेला नाही. आणि शिवसेनेने त्याबद्दल अगदी उघडपणे महायुती मधील घटक पक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयाच्या अगदी जवळपासही पोचला नव्हता.

इसवी सन 2025 मध्ये महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या. या निवडणुकीत महायुतीने भरघोस यश मिळवले होते. अर्थातच त्यामुळे विधान परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ महायुतीसाठी भक्कम झाले होते. विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा मार्ग सुकर झाला होता आणि म्हणूनच इथे उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच झाली होती. विधान परिषदेच्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 11, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे होते. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 618 इतकी होती. महायुतीचे दराडे हे सहज निवडून येणे अपेक्षित होते मात्र त्यांना 248 मते मिळाली आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना 357 मते मिळाली. याचा अर्थ महायुतीची मते मोठ्या प्रमाणावर फुटली गेली. छगन भुजबळ यांच्यासारखे मातब्बर नेते
नाशिक मध्ये असूनही तेथे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला.

पराभूत उमेदवार दराडे यांनी आपल्या पराभवासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. एकनाथ शिंदे यांनीही त्याची गांभीर्याने दखल घेतली असून आपला उमेदवार पराभूत का झाला याची चौकशी आता केली जाईल. विधान परिषदेच्या या निवडणुकीतही महायुतीमध्ये भाजप हा थोरला (देवा)भाऊ ठरला आहे.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदारांची संख्या मर्यादित असते. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती हे मतदार असतात. (election) मर्यादित मतदार संख्या असल्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी सोपी असते मात्र या निवडणुकीत पैशाचा खेळ मोठ्या प्रमाणावर होतो हे उघड सत्य आहे.

हेही वाचा :

समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?

विधान परिषदेचा 17 जागांचा निकाल जाहीर?

प्रशासनाकडून पाणी व्यवस्थापनाचा बोजवारा?