तृणमूल काँग्रेसला घरघर! मोदी सरकार झाले भक्कम!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अनेक वर्षांची मक्तेदारी मोडून काढत पश्चिम बंगालवर स्वबळावर कब्जा मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसची आता वाताहत झाली आहे. या पक्षाच्या सर्वेसर्वा श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या हातून पक्ष निसटला असून, (Trinamool Congress) त्यांची अवस्था अत्यंत शोचनीय झाली आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय उलथापालथीमुळे केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार मात्र भक्कम झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची गेली पंधरा वर्षे अनिर्बंध सत्ता होती. गेल्या महिन्यात झालेल्या तेथील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळवून तृणमूल काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढले आहे.

काँग्रेसचे 28 खासदार होते आणि आता त्यापैकी 20 खासदारांनी संसदेत वेगळा गट स्थापन करून एन डी ए मध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेस ही आता आमची आहे, ममता बॅनर्जी यांचा पक्षाशी काहीही संबंध उरलेला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे 80 उमेदवार निवडून आले आहेत. आता त्यापैकी 58 आमदारांनी तिथे वेगळीच चूल मांडली आहे.(Trinamool Congress) त्यांनीही ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेसशी कोणताही संबंध राहिलेला नाही अशी भूमिका घेऊन ममता बॅनर्जी यांच्या कारभारामुळेच पश्चिम बंगालमधील सत्ता गेली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. तीन चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडले नेमके तेच पश्चिम बंगाल मध्ये घडले आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड करून,मूळ शिवसेना ताब्यात घेतली.त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेची “उरली सुरली” अशी अवस्था झाली आहे.

शिवसेना नेमकी कुणाची याचा निर्णय अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना देऊन त्यांचेच शिवसेना खरी असल्याचे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी मोठ्या कष्टातून उभ्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार यांनी मोठे बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात घेतली. (Trinamool Congress) त्यांनाही घड्याळ हे अधिकृत निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एन डी ए चे घटक पक्ष आहेत.याशिवाय चंद्राबाबू नायडू तसेच नितेश कुमार यांच्यासह एन डी ए मध्ये एकूण 38 छोटे मोठे पक्ष आहेत. एन डी ए चे एकूण संख्या बळ 293 आहे. तथापि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार या दोघांनी पाठिंबा काढून घेतला तर केंद्र सरकार कोसळू शकते असे सातत्याने राजकीय मंचावर बोलले जात आहे. पण आता तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी मोदी सरकारला पाठिंबा दिल्यामुळे हे सरकार आता भक्कम झाले आहे.

तृणमुल काँग्रेसच्या 20 खासदारांनी एन डी ए मध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे राजकीय महत्त्व कमी होणार आहे. काही महिन्यापूर्वीच अमित शहा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या कुबड्या असे म्हटले होते. आम्ही आमच्या पायावर भक्कमपणे उभा राहिलो तर आम्हाला कुबड्यांची गरज भासणार नाही असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांना महत्त्व आहे. ते अजूनही टिकून आहे. शिंदे हे भारतीय जनता पक्षाशी बार्गेनिंग करू शकतात इतकी त्यांची ताकद आहे. पण आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस मोठ्या प्रमाणावर फोडण्यात भाजपला यश आल्यानंतर, तुमची बार्गेनिंग पॉवर आता पूर्वी इतकी राहिलेली नाही असा एक सुप्त संदेश भाजप महाराष्ट्रातील शिवसेनेला देऊ शकेल अशी परिस्थिती सध्याची आहे. पण सध्या तरी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बे दखल केले जाईल असे वाटत नाही.

हेही वाचा :

तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी

SBI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा