नृसिंहवाडीत दत्त मंदिरासमोर कृष्णेचे पाणी दक्षिणद्वार सोहळ्याची उत्कंठा वाढली?

नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराच्या परिसरात कृष्णेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, पाणी आता मंदिरासमोर पोहोचले आहे. (Nrusinghwadi) यामुळे भाविकांचे अलोट श्रद्धास्थान असलेल्या बहुचर्चित ‘दक्षिणद्वार सोहळ्याची’ उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात तसेच कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी, नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कृष्णेचे पाणी आता नृसिंहवाडीत श्री दत्त मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन धडकले आहे. (Nrusinghwadi) दरवर्षी पावसाळ्यात जेव्हा नदीचे पाणी मंदिरात प्रवेश करते, तेव्हा हा अलौकिक क्षण पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.जेव्हा हे पुराचे पाणी मंदिराच्या दक्षिण दरवाजातून आत येते आणि श्रींच्या चरणांना स्पर्श करते, तेव्हा त्याला पवित्र ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे संबोधले जाते. निसर्गानेच घातलेला हा जलाभिषेक डोळे भरून पाहणे ही प्रत्येक दत्तभक्तासाठी मोठी पर्वणी असते.

सद्यस्थितीत पुराचे पाणी मंदिराच्या प्लॅटफॉर्मवर आले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी पाणी दक्षिण दरवाजातून आत प्रवेश करेल, (Nrusinghwadi) अशी दाट शक्यता आहे. प्रशासनाने आणि मंदिर समितीने या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती सर्व खबरदारी घेतली आहे. पाणी वेगाने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. असे असले तरी, श्री दत्तगुरूंच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी आतुरलेल्या कृष्णेच्या पाण्याने आणि या आगामी दक्षिणद्वार सोहळ्याच्या ओढीने संपूर्ण नृसिंहवाडीत सध्या प्रचंड उत्साह आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?