‘एमपीएससी’च्या पीएसआय भरतीसमोर नवीन संकट, निकाल जाहीर न झाल्याने तयारीबाबत संभ्रम?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अराजपत्रित गट-ब संयुक्त सेवा मुख्य परीक्षा २०२५ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Examination) अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध होऊन दिड महिना उलटला असतानाही गुणवत्ता यादी जाहीर झालेली नसल्याने पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या पुढील टप्प्यांची तयारी करायची की नाही, असा प्रश्न उमेदवारांसमोर आहे.

आयोगाच्या अध्यक्षांनी एका मुलाखतीत मुख्य परीक्षेचा निकाल दोन महिन्यांत जाहीर करण्याचे सांगितले होते. तसेच दोन टप्प्यांची परीक्षा सहा महिन्यांत पूर्ण करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, गट-ब २०२५च्या प्रक्रियेत या कालमर्यादेचे पालन होत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. पूर्व परीक्षेची जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्याला जवळपास वर्ष होत आले असतानाही संपूर्ण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. निकालाला विलंब होण्याचे कारणही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. गट-ब संयुक्त सेवा मुख्य परीक्षा १७ मे रोजी झाली. (Examination) त्यानंतर प्रथम उत्तरतालिका २७ मे रोजी, तर अंतिम उत्तरतालिका १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः १५ ते २० दिवसांत सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होण्याची अपेक्षा असते. मात्र, यावेळी अंतिम उत्तरतालिकेला सव्वा महिना उलटूनही गुणवत्ता यादीची प्रतीक्षा कायम आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या सचिवांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गट-बमध्ये ‘पीएसआय’ पदासाठी पात्र ठरण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांसमोर गुणवत्ता यादीच्या विलंबामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. गुणवत्ता यादीतील क्रमांक स्पष्ट झाल्यानंतरच पुढील टप्प्यासाठी पात्रता निश्चित होणार असल्याने शारीरिक चाचणीची तयारी सुरू करावी की नाही, याबाबत उमेदवारांमध्ये द्विधा मनःस्थिती आहे. शारीरिक चाचणीसाठी सरावाला वेळ लागतो. (Examination) त्यामुळे गुणवत्ता यादी वेळेत जाहीर न झाल्यास पात्र उमेदवारांना तयारीसाठी उपलब्ध कालावधी कमी होण्याची भीती आहे. गुणवत्ता यादी लवकर जाहीर झाल्यास उमेदवारांना पुढील टप्प्याचे नियोजन करणे शक्य होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. निकालाला होणाऱ्या विलंबाचा परिणाम पुढील गट-ब परीक्षांवरही होण्याची शक्यता आहे. गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी पुढील परीक्षा दिल्यानंतर दोन्ही ठिकाणी निवड झाल्यास काही पदे रिक्त राहण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी, अन्य पात्र उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागू शकते.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?