आधार कार्ड अपडेट बाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय सामान्यांना मोठी खुशखबर ?

आधार कार्डवरील सर्व माहिती योग्य आणि अपडेटेड असणे फार गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांचे पैसे वाचणार आहेत.आजघडीला आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर अनेक शासकीय कामे, शासकीय योजनांचा लाभ घेताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे आधार कार्डवरील नाव, पत्ता यावरूनच तुमची ओळख ठरवली जाते. म्हणूनच आधार कार्डवरील सर्व माहिती योग्य आणि अपडेटेड असणे फार गरजेचे आहे. (Aadhaar card) हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांचे पैसे वाचणार आहेत.

तुम्हाला आधार कार्डवरील ई-मेल आयडी बदलायचा असेल किंवा त्यात काही दुरुस्ती करायची असेल तर UIDAI ने तुम्हाला एक चांगली संधी दिली आहे. UIDAI ने घेतलेल्या नव्या निर्णयानंतर तुम्हाला 31 डिसेंबर 2026 पर्यंत ई-मेल आयडी बदलता येणार आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पार पडताना तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही स्वत:च तुमच्या ई-मेल आयडीमध्ये बदल करू शकता. अगोदर आधारमधील ई-मेल आयडी बदलायचा असेल तर 75 रुपये फी आणि जीएसटी आकारला जायचा. (Aadhaar card) आता मात्र तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मदतीने एक रुपयाही खर्च न करता ई-मेल आयडीमध्ये बदल करू शकता. आधार सेवा केंद्रावर जाण्याची तुम्हाला गरज नाही.

आधार कार्डवरील ई-मेल आयडी योग्य असणे खूपच गरजेचे आहे. कारण अनेकदा तुम्हाला एखादा अर्ज भरताना ई-मेल व्हेरिफाय करावा लागतो. तुमचे आधार कार्ड ई-मेलच्या मदतीनेही व्हेरिफाय होऊ शकते. UIDAI ने सांगितल्यानुसार तुम्हाला ई-मेलमध्ये 31 डिसेंबर 2026 पर्यंत विनामूल्य बदल करता येतील. दरम्यान, ई-मेल अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे UIDAI चे अधिकृत Aadhaar App असणे गरजेचे आहे. त्या अॅपवर लॉगिन करून Update Email किंवा Update Aadhaar Details या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर नवा ई-मेल आयडी टाकावा आणि (Aadhaar card) त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?

पीएफ खातेधारकांसाठी नवीन नियम, पेन्शनबाबतही मोठे बदल?

धाड धाड कोसळले तेलाचे भाव, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट?