एकदम सोप्या पद्धतीत तुमची ‘डिजिटल सही’ कशी बनवाल? जाणून घ्या

आजकाल सगळं काही डिजिटल होत चाललं आहे. (digital)अशावेळी आपल्या सहीलाही डिजिटल स्वरूप मिळणं गरजेचं झालं आहे. कागदावर आपण हाताने सही करतो, पण ऑनलाइन जगात किंवा अनेक कायदेशीर कामांसाठी आता ‘Digital Signature Certificate DSC’ लागतं. हाताने केलेल्या सहीची नक्कल करणं सोपं असू शकतं, पण डिजिटल सहीची नक्कल करणं तितकं सोपं नाही, कारण ती खूप सुरक्षित असते. यामुळे कागदपत्रांची पडताळणी सोपी, जलद आणि सुरक्षित होते.

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे तुमच्या ओळखीचा एक इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे, जो एका पेन ड्राईव्हसारख्या डिव्हाइसमध्ये साठवलेला असतो. जेव्हा तुम्ही एखादं डिजिटल डॉक्युमेंट या सहीने प्रमाणित करता, तेव्हा ते डॉक्युमेंट सुरक्षित होतं आणि त्यात कोणी बदल करू शकत नाही, तसेच सही करणारी व्यक्ती तीच आहे याची खात्री पटते. डिजिटल सहीचा वापर प्रामुख्याने इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन भरणे,(digital)कंपनीशी संबंधित कायदेशीर कामं, E-tendering प्रक्रियेत भाग घेणे, GST संबंधित कामांसाठी आणि अनेक सरकारी पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी व कागदपत्रं सबमिट करण्यासाठी होतो.

स्टेप 2 : Individual किंवा Organization साठी DSC चे फॉर्म भरा.

स्टेप 3 : Aadhaar/eKYC किंवा पॅन कार्ड, फोटो, पत्त्याचा पुरावा यासारखी कागदपत्रं अपलोड करा.

स्टेप 4 : eKYC किंवा व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.

स्टेप 5: शुल्क भरल्यानंतर तुम्हाला DSC USB टोकन किंवा डाउनलोड सर्टिफिकेट मिळेल.

PDF फाईलवर डिजिटल सही कशी करायची?
Adobe Acrobat Reader उघडा , Tools वर जा , Fill & Sign वर क्लिक करा.

“Sign” बटणावर क्लिक करून “Add Signature” निवडा.

तुमची सही टाइप, ड्रॉ किंवा इमेज म्हणून अपलोड करू शकता.

सही योग्य ठिकाणी ठेवून “Apply” करा.

डिजिटल सिग्नेचर बनवण्याचा खर्च साधारणपणे ₹१००० पर्यंत असू शकतो. हा खर्च DSC चा क्लास, त्याची वैधता आणि तुम्ही निवडलेल्या सर्टिफाइंग अथॉरिटीवर अवलंबून असतो.डिजिटल सहीचा उपयोग अनेक महत्त्वाच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये केला जातो. सर्वप्रथम, (digital)आयकर विभागाकडे आयटीआर ऑनलाइन फाईल करताना डिजिटल सही आवश्यक असते, विशेषतः व्यवसायिक किंवा कंपन्यांसाठी. तसेच, ई-टेंडरिंग प्रक्रियेत किंवा सरकारी कंत्राटांसाठी अर्ज करताना, डिजिटल सिग्नेचरद्वारे दस्तऐवज सादर करणे अनिवार्य असते. जीएसटी नोंदणीसाठी, कॉर्पोरेट कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना, लॉजिस्टिक किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये डिजिटल सहीचा वापर प्रामुख्याने केला जातो. याशिवाय, विविध सरकारी पोर्टल्सवरील सेवांचा लाभ घेताना अधिकृत ओळख दर्शवण्यासाठीही डिजिटल सही उपयुक्त ठरते. त्यामुळे, डिजिटल सही ही केवळ एक सुलभता नव्हे, तर एक सुरक्षित आणि कायदेशीर ओळख सिद्ध करणारे प्रभावी माध्यम आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी महावितरण अधिकाऱ्याला लाच घेताना ACB ने धरले

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदांची घोषणा

“आता थांबायचं नाही” चित्रपटाचे इचलकरंजीतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आयोजन