मोठी बातमी! पाकिस्तानचा मित्र तु्र्कीला भारताचा दणका;

पाकिस्तान, चीननंतर आता भारताने तुर्कीकडे आपला मोर्चा वळवला आहे.(blow) सातत्याने पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताने जोरदार दणका दिला आहे. तुर्कीचे ब्रॉडकास्टर टीआरटी वर्ल्डचे एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे. याआधी भारत सरकारने चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे अकाउंट भारतात बंद केले होते. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआवरही बंदी घातली. यानंतर अशीच कारवाई तुर्कस्तानच्या वृत्तसंस्थेवर करण्यात आली आहे.

ग्लोबल टाईम्स भारताविरुद्ध बनावट बातम्या चालवत होते, त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. आज या वृत्तपत्राचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले. याआधी भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी तथ्य काय आहेत त्याची खात्री करा असा इशारा दिला होता. दूतावासाने एक्स पोस्टमध्ये म्हटले होते की, ग्लोबल टाइम्स न्यूज आम्ही आपल्याला सल्ला देतोय की चुकीची माहिती पोस्ट करण्याआधी तथ्यांची खात्री करुन घ्या. माहितीच्या स्त्रोतांचीही तपासणी करा.

ग्लोबल टाईम्स हे चीनचे मुखपत्र आहे, जे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अजेंड्याला पुढे नेण्याचे काम करते. एवढेच नव्हे तर, या मुखपत्रातून भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. (blow) ग्लोबल टाईम्सवर कारवाई करण्यापूर्वी भारताने अरुणाचल प्रदेशबाबत आफली भूमिका स्पष्ट केली. ज्यात अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनचे प्रयत्न हास्यास्पद असून, हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे निर्विवाद सत्य बदलणार नसल्यााचे छातीठोकपणे सांगितले.

टीआरटी वर्ल्ड भारताविरुद्ध सातत्याने चुकीच्या बातम्या आणि भ्रामक माहिती पसरवण्याचे काम करत होते. तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यर एर्दोगन यांनी तर पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. यानंतर भारताने तुर्कीलाही त्याची जागा दाखवून दिली आहे(blow) . तुर्कीच्या लीडिंग ब्रॉडकास्टरचे भारतातील एक्स अकाउंट बंद केले आहे. भारतात आजघडीला तुर्कीच्या बॉयकॉटची मोहिम जोरात सुरू आहे. भारतीय नागरिकांनी तुर्की आणि अजरबैजानच्या यात्रांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. अनेक टुरिस्ट कंपन्यांनी देशहिताला प्राधान्य देत तुर्की आणि अजरबैजानचे विमान, हॉटेल्स बुकिंग रद्द केले आहेत.

हेही वाचा :

इचलकरंजी महावितरण अधिकाऱ्याला लाच घेताना ACB ने धरले

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदांची घोषणा

“आता थांबायचं नाही” चित्रपटाचे इचलकरंजीतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आयोजन