आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

घराच्या अंगणात पडलेले आंबे खाल्ल्याने विषबाधेतून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतराने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (mangoes) याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वरी (वय १७) आणि तिची लहान बहीण संध्या (वय १०) या दोन्ही मुलींनी रविवारी (mangoes) त्यांच्या घराजवळ पडलेले काही आंबे उचलले आणि ते खाल्ले. आंबे खाल्ल्यानंतर रविवारी संध्याकाळीच त्यांची प्रकृती बिघडली. दोघींनाही उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुलींची प्रकृती खालावल्याचे पाहून पालकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मोठी बहीण भुवनेश्वरी हिचा मृत्यू झाला. तर, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही लहान बहीण संध्या हिने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. एकाच वेळी दोन चिमुरड्या मुली गमावल्यामुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बहिणींचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. (mangoes) या धक्कादायक घटनेनंतर मुलींच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. नारायणगुडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मुलींनी खाल्लेले आंबे विषारी होते का, किंवा त्यावर काही रासायनिक औषध फवारले होते का, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा :

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?

तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

सोनसाखळी चोरणारे चौघे जेरबंद