इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी “आता थांबायचं नाही” या चित्रपटाचे(film) मोफत विशेष आयोजन फॉर्च्युन सिनेप्लेक्स, इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये शेकडो सफाई कर्मचारी सहभागी झाले. चित्रपटाच्या(film) माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून देण्यासोबतच समाजात त्यांचा सन्मान वाढवण्याचा सकारात्मक संदेश दिला गेला.
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. पल्लवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुषमा शिंदे, फॉर्च्युन सिनेप्लेक्सचे मालक श्री. अपूर्व शाह, सीओओ श्री. विशाल पाटील, तसेच सिनेमाचे व्यवस्थापक श्री. प्रदीप होनराव व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
कार्यक्रमानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला व अशा उपक्रमामुळे त्यांना नवीन ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.
हेही वाचा :
इचलकरंजी महावितरण अधिकाऱ्याला लाच घेताना ACB ने धरले
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदांची घोषणा
स्क्रीनच्या थकव्यापासून सुटका डोळ्यांना आराम देण्यासाठी करा 3 सोपे उपाय