पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांवरील अतिरेकी हल्ल्याचा इचलकरंजीत तीव्र निषेध; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व विश्वहिंदू परिषदेकडून मोर्चा काढला

पहलगाम येथे निष्पाप लोकांवर करण्यात आलेल्या भयानक अतिरेकी हल्ल्याच्या(terrorist attack) निषेधार्थ, आज दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी इचलकरंजी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि विश्वहिंदू परिषदेच्या वतीने तीव्र निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

दुपारी साडेचार वाजता हा मोर्चा मोठ्या उत्साहात आणि संतप्त वातावरणात सुरू झाला. मोर्चात सहभागी नागरिकांनी “दहशतवादाचा(terrorist attack) निषेध असो”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.

मोर्चाचा समारोप प्रांत कार्यालय येथे झाला, जिथे निषेधाचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात विविध संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक व युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या माध्यमातून पहलगाममधील अतिरेकी कृत्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या निषेध मोर्च्यामुळे इचलकरंजीत राष्ट्रभक्तीची लाट पसरली असून, देशाच्या सुरक्षेसाठी सर्व स्तरांवर एकजूट करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

‘या’ बाईकचा नादच खुळा ! चक्क कंपनी देतेय कारसारखे फीचर्स

‘सीमा, तुला…’; पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या पहिल्या नवऱ्याची थेट धमकी

शरद पवार गटात भूकंप! जयंत पाटलांकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द; अंतर्गत वाद उफाळला?