इचलकरंजी : येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात मिलिडीज पंचम या संगीतमय कार्यक्रमाचे(Musical program) आयोजन बुधवारी (दि.१३) सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आले आहे.विनामूल्य हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी ठेवण्यात आला आहे.

आर.डी.बर्मन यांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रशांत होगाडे आणि ऋषिकेश ठाकूर-देसाई या निर्मात्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे.
उत्तम ध्वनी व्यवस्था आणि अत्याधुनिक लाईटच्या झोतात, नामवंत वादकांच्या संगीत(Musical program) साथच्या माध्यमातून निता ठाकूर-देसाई, प्रवीण होगाडे, प्रशांत होगाडे, महेश शिंदे, डॉ. दीपक कुंभार हे विविध गीते सादर करणार आहेत. याला पुण्यातील प्राजक्ता जोगळेकर या आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन करणार आहेत.
हेही वाचा :
हार्दिक पंड्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे
सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत सरकारला महत्वाचा आदेश
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर