‘या’ बाईकचा नादच खुळा ! चक्क कंपनी देतेय कारसारखे फीचर्स

भारतीय ऑटो बाजारात टू व्हीलर सेगमेंटमध्ये नेहमीच बाईक्सना मोठी मागणी मिळत असते. त्यात देशात हाय परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकची(bike) एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ज्यामुळे अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या अशा देखील बाईक बाजारात आणतात, ज्या दिसण्यात तर दमदार असतातच पण त्यांचा परफॉर्मन्स देखील भल्याभल्या बाईक्सना मागे सोडतो. नुकतेच मार्केटमध्ये एक अशी बाईक बाजारात आली आहे, ज्यात कार सारखे फीचर्स देण्यात आले आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

इंडियन मोटरसायकलने Challenger Elite आणि Pursuit Elite सादर केल्या आहेत. या दोन्ही बाईक्स लिमिटेड एडिशन्समध्ये लाँच केल्या गेल्या आहेत. जगभरात या बाईक्सचे(bike) अंदाजे फक्त 350 आणि 250 युनिट्स विकल्या जाणार आहे. या दोन्ही लिमिटेड एडिशन उत्कृष्ट ग्राफिक्स, डिझाइन आणि फीचर्ससह सुसज्ज आहेत. Indian Challenger Elite आणि Pursuit Elite मध्ये कोणते फीचर्स असणार आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

इंडियन चॅलेंजर एलिट
या बाईकवर अलाबामा फ्लॅश वॉकरची बॅजिंग आहे, ज्याने 1920 मध्ये त्याच्या इंडियन पॉवरप्लसवर लैंड-स्पीड रिकॉर्ड केला होता आणि त्याला त्याच्या काळातील सर्वात वेगवान माणूस मानले जात होते. ती एका खास पांढऱ्या आणि लाल रंगाच्या स्कीममध्ये काळ्या पट्ट्यासह आणण्यात आली आहे. या काळ्या पट्ट्या वरच्या पांढऱ्या भागाला खालच्या लाल भागापासून वेगळे करते. दोन्ही मॉडेल्सचे लिमिटेड एडिशन्स अधिक आकर्षक दिसावे यासाठी इंडियनने एक अतिशय वेगळे डिझाइन आणि विशेष बॅजिंग दिले आहे.

इंडियन चॅलेंजर पर्सुइट एलिट
1916 मध्ये अमेरिकन सैन्याला पुरवण्यात आलेल्या 20000 पॉवरप्लस बाईक्सपासून सुरू झालेली या ब्रँडची लष्करी कथा याला इतर बाईकपेक्षा वेगळी करते. ही गाडी ड्युअल-टोन ब्लॅक आणि ग्रीन पेंट स्कीममध्ये येते ज्यामध्ये हाताने रंगवलेले सोनेरी रंग आहेत. यात प्रीमियम डार्क हॉर्स फिनिश, पॉवरप्लस 112 इंजिन कव्हर, एलिट बॅजिंग आणि एक खास नंबर असणारा कन्सोल देखील दिला आहे.

इंजिन आणि पॉवर
Indian Challenger ने त्यांच्या दोन्ही बाईकमध्ये(bike) समान 1,834cc सीसी लिक्विड-कूल्ड व्ही-ट्विन इंजिन वापरले आहे. हे इंजिन 126 एचपी पॉवर आणि 181.4 एनएम टॉर्क जनरेट करते. चाकांना पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

फीचर्स
चॅलेंजर एलिट आणि पर्सुइट एलिटमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि बाइक सेटिंग्जसाठी यामध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन ॲपल कारप्ले आहे. यात अ‍ॅडॉप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल, कीलेस इग्निशन, इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल विंडशील्ड आणि मागील सस्पेंशनसाठी इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल प्रीलोड देखील आहे.

हेही वाचा :

काश्मीरच्या हृदयात भारत आहे की पाकिस्तान? स्थानिक महिलेचा खुलासा; Video Viral

शरद पवार गटात भूकंप! जयंत पाटलांकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द; अंतर्गत वाद उफाळला?

शिंदे गटाच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ