शिवसेना (शिंदे गट) चे जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून(political circles) गोळी झाडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिमन्यू खोतकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चार वेगवेगळ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या गेल्या(political circles). या मेसेजमध्ये त्यांना गोळ्या घालण्याची धमकीही देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला असून सायबर क्राइम विभागाच्या सहकार्याने संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
घटनेनंतर खोतकर परिवारात चिंता आणि संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यावर आमदार अर्जुन खोतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे बळी गेले, ही अतिशय वेदनादायक बाब आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.”

या धमकी प्रकरणामुळे जालना शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिकारी म्हणाले की, “तपास जलदगतीने सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल.”
हेही वाचा :
पाकिस्तानचे पुन्हा तुकडे होणार? भारत उचलणार मोठे पाऊल
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या घरी स्फोट; पोलीस पोहोचताच घर झालं उद्ध्वस्त Video