उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना मोठे आदेश, उद्यापासून 420 कोटी रुपये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना मोठ्या सूचना दिल्या आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्यावर एक मोठी आणि महत्वाची जबाबदारी त्यांनी दिली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सूचना या दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना मोठ्या सूचना दिल्या आहेत. उद्या कॅबिनेटनंतर सर्व मंत्र्यांना ग्राऊंडवर उतरून शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्या. मंत्री भरत गोगावले (Eknath Shinde) यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी, चार तालुक्यांची परवापासून करणार पाहणी. नांदेडला करणार साहित्याचं वाटप. लातूर, बीड, संभाजीनगर , यांचाही करणार दौरा करणार. बंधारे, गाळ काढणं, चारा छावणी आणि इतर महत्वाची कामे करण्यासाठी मंत्री उद्यापासून कामाला लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्व मंत्र्यांना आदेश आहेत. केंद्राकडून आलेले 420 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हेक्टरी 1 लाख 31 हजार रुपये शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत.

भरत गोगावले यांनी वृक्षतोडी तोडीवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हा टोरंट प्रकल्प गावामध्ये येऊ घातला आहे. लोकसंख्या वाढत आहे. तिसरी मुंबई आपल्याला तयार करायची आहे. 48 हजार 500 झाड तुटणार आहे आणि आम्ही झाडाची लागवड सुद्धा करत आहोत. 70 हजाराच्या वरती झाड आम्ही लावणार आहोत.(Eknath Shinde) मोठ्या मोठ्या प्रकल्पाची अडवणूक कशी होईल, याकडे विरोधी पक्षाचे लक्ष आहे. परंतू हे सगळ होत असताना कुठलाच प्रकल्प येऊ द्यायचा नाही का? ती जागा अशी आहे की तिथेच तो प्रकल्प उभा राहू शकतो. ह्यांनी कोणी सांगितलं आहे, त्यांची आम्ही चौकशी करू.

भरत गोगावले यांनी पुढे म्हटले की, राजकारणामध्ये कधी कोणासोबत जुळेल आणि कधी बिनसल हे सांगता येत नाही. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, सगळ्यात जास्त डेवलपिंग रायगड जिल्हामध्ये होत आहे. एक्सप्रेस हाईवे मिसिंग लिंग पुणे, ठाणे, रायगड, मुंबई, पालघर हे आतमधील भाग आहेत म्हणून इथे प्रकल्प आणले जातात.

संजय राऊत हे वेगळ रसायन आहे. काही तडकभडक मिळावे, असे त्यांना वाटते. (Eknath Shinde) त्यांना कोणी मिळाला नाही म्हणून श्रीकांत शिंदे मिळाले. तुम्हाला पूर्ण कल्पना आहे की, एकनाथ शिंदे सर्वांच्या मागे उभे आहेत. SIT चौकशी व्हावी. आपण युतीमध्ये काम करतो तर विचार विनिमय होणे महत्वाचे आहे. विजय वडेट्टीवार यांच्याविषयावर बोलताना त्यांनी म्हटले की, आता ऑक्टोबर महिना संपत आहे, सव्वा महिना त्यांनी त्यांची तयारी करावी. त्यांचे उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही देऊ.रामदास कदम यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, रामदास भाई यांच्यासोबत वैयक्तीक पातळीवर चर्चा झाली आहे. अर्थ खात्याबद्दल बोलताना भरत गोगावले यांनी म्हटले की, अजित पवार गेल्यापासून ते बीजेपीकडे आहे. आम्हाला वाटते की, त्यांना त्यांचे खाते द्यावे, असे आम्हाला नक्कीच वाटते.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा